Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Paani Teaser : लालबागच्या राजाचं दर्शन घेत प्रियंका चोप्राच्या ‘पाणी’ चित्रपटाचा टीझर रिलीज, दिसणार मराठवाड्यातील पाण्याची भीषणता

मराठवाड्यातील हनुमंत केंद्रे या 'जलदूता'च्या जीवनाला प्रेरित होऊन, सत्यघटनेवर आधारित 'पाणी' चित्रपट येत्या १८ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाच्या पोस्टरची सर्वत्र चर्चा होत असतानाच टीमने लालबागच्या राजाचे आशीर्वाद घेत 'पाणी' चित्रपटाचा टीझरही लाँच केला.

  • By चेतन बोडके
Updated On: Sep 14, 2024 | 08:25 PM
लालबागच्या राजाचं दर्शन घेत प्रियंका चोप्राच्या 'पाणी' चित्रपटाचा टीझर रिलीज, दिसणार मराठवाड्यातील पाण्याची भीषणता

लालबागच्या राजाचं दर्शन घेत प्रियंका चोप्राच्या 'पाणी' चित्रपटाचा टीझर रिलीज, दिसणार मराठवाड्यातील पाण्याची भीषणता

Follow Us
Close
Follow Us:

Paani Teaser : मराठवाड्यातील हनुमंत केंद्रे या ‘जलदूता’च्या जीवनाला प्रेरित होऊन, सत्यघटनेवर आधारित ‘पाणी’ चित्रपट येत्या १८ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. राजश्री एंटरटेन्मेंट आणि पर्पल पेबल पिक्चर्स, कोठारे व्हिजन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे एक नवीन पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर झळकले असून त्यातील आदिनाथ कोठारेचा लूक समोर आला आहे. या पोस्टरची सर्वत्र चर्चा होत असतानाच चित्रपटाच्या टीमने लालबागच्या राजाचे आशीर्वाद घेत ‘पाणी’ चित्रपटाचा टिझरही लाँच केला. त्यामुळे एकाच वेळी ‘पाणी’चे पोस्टर आणि टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. टिझर पाहून हनुमंत केंद्रे या महान व्यक्तीचे आयुष्य जवळून जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना लागली आहे.

हे देखील वाचा – “आपला पॅडी का रडला?”, प्रश्नाचं उत्तर देत विशाखा सुभेदारने सांगितला पंढरीनाथ कांबळेचा ‘तो’ किस्सा

आदिनाथ कोठारे दिग्दर्शित या चित्रपटात हनुमंत केंद्रे यांची भूमिका आदिनाथ कोठारे स्वतः साकारणार असून यात रुचा वैद्य, सुबोध भावे, रजित कपूर, किशोर कदम, नितीन दीक्षित, सचिन गोस्वामी, मोहनाबाई, श्रीपाद जोशी, विकास पांडुरंग पाटील अशा दमदार कलाकारांची मांदियाळी असणार आहे. ‘पाणी’ची कथा नितीन दीक्षित आणि आदिनाथ कोठारे यांची असून नेहा बडजात्या, दिवंगत रजत बडजात्या, प्रियांका चोप्रा जोनस, डॅा. मधू चोप्रा या चित्रपटाचे निर्माते आहेत. तर महेश कोठारे, सिद्धार्थ चोप्रा या चित्रपटाचे सहयोगी निर्माते आहेत.

मराठवाड्यात पाण्याची भीषण परिस्थिती आहे, हे सर्वश्रूत आहे. येथील अनेक जण गाव सोडून जात असतानाच हनुमंत केंद्रे या तरुणाने तिथेच राहून गावकऱ्यांसाठी पाणीपुरवठा आणण्याचा प्रयत्न केला. त्यांचा हा प्रवास निश्चितच सोप्पा नव्हता. गावात पाणी नाही म्हणून, त्यांचे लग्नही होत नव्हते. त्यांच्या आयुष्यातील हाच संघर्ष या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. टिझरमध्ये त्यांची प्रेमकहाणीही दिसत आहे, आता ती पूर्ण होतेय का, गावात पाणी आणण्यात हनुमंत यांना यश येते का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला ‘पाणी’ पाहून मिळणार आहेत.

या चित्रपटाबद्दल पर्पल पेबल पिक्चर्सची संस्थापक आणि प्रवर्तक प्रियांका चोप्रा जोनस म्हणते, ”पर्पल पेबल पिक्चर्सच्या माध्यमातून, आम्हाला अशा कथा घेऊन यायच्या ज्या ऐकण्याची, जाणून घेण्याची प्रेक्षकांची इच्छा आहे. गंभीर समस्यांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या कथा आम्हाला प्रेक्षकांसमोर घेऊन यायच्या आहेत आणि आमचा ‘पाणी’ चित्रपट असाच आहे. हा चित्रपट आमच्यासाठी खास आणि प्रासंगिक आहे. ही कथा तुम्हाला नक्कीच प्रेरित करेल. मुंबईच्या प्रसिद्ध लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन या चित्रपटाचा टीझर लाँच करण्यापेक्षा चांगली सुरुवात कोणती असू शकते.’’

हे देखील वाचा – रणदीप हुड्डाने सपत्नीक सर्वसामान्यांबरोबर गर्दीतून घेतले लालबागच्या राजाचे दर्शन, नेटकऱ्यांनी अभिनेत्याच्या साधेपणाचे केले कौतुक

राजश्री एंटरटेन्मेंटच्या नेहा बडजात्या म्हणतात, ”मराठी प्रेक्षक हे खूप चोखंदळ असतात. त्यामुळे एखादा चांगला विषय घेऊन मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करावे, या प्रतीक्षेत आम्ही होतो आणि ‘पाणी’च्या माध्यमाने आम्हाला आमचा चित्रपट मिळाला. या निमित्ताने आम्ही पर्पल पेबल पिक्चर्स आणि कोठारे व्हिजन प्रायव्हेट लिमिटेड यांसारख्या दोन नामांकित प्रोडक्शन हाऊससोबत जोडले गेलो. चित्रपटाची संपूर्ण टीम कमाल असून आता चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी आम्ही उत्सुक आहोत. आज बाप्पाच्या साक्षीने आमचा टिझर प्रदर्शित झाला. प्रेक्षकांचे याला भरभरुन प्रेम मिळत आहे. असेच प्रेम प्रेक्षकांनी चित्रपटावरही करावे.”

दिग्दर्शक आदिनाथ कोठारे म्हणतो, ”आज चित्रपटातील हनुमंत केंद्रेचा लूक समोर आला असून टिझरही प्रदर्शित झाले आहे. हनुमंत केंद्रे हा चेहरा अवघ्या जगभरात पोहोचला असून त्याचे कर्तृत्व प्रेक्षकांना ‘पाणी’मधून अनुभवता येणार आहे. मला आनंद आहे, की एवढे मोठे व्यक्तिमत्व साकारण्याची संधी मला मिळाली आहे.”

Web Title: Actress priyanka chopra jonas produced paani marathi movie teaser released at lalbagcha raja mandal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2024 | 08:02 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.