रश्मिका मंदान्नाचा अपघात, स्वत:च दिली माहिती; म्हणाली, "दररोज आनंदात जगा..."
Rashmika Mandanna Recovering From Minor Accident : बॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंदान्ना सध्या ‘पुष्पा २’ मुळे चर्चेत आहे. रश्मिकाचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. ती कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते. अशातच रश्मिका सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. रश्मिकाने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत चाहत्यांना ॲक्सिडंट झाल्याची माहिती दिली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री सोशल मीडियावर फारशी चर्चेत दिसत नाहीये. शिवाय ती पापाराझींच्या कॅमेऱ्यातही स्पॉट झाली नाही. त्यामुळे चाहत्यांमध्ये, रश्मिका सध्या काय करते ? अशी चर्चा सुरू असतानाच आता रश्मिकाच्या हेल्थबद्दल महत्वाची बातमी समोर आली आहे. गेल्या महिन्यात अभिनेत्रीचा ॲक्सिडंट झाला होता. अभिनेत्रीने इन्स्टा पोस्ट शेअर करत तिची हेल्थ अपडेट चाहत्यांना दिली आहे.
एक फोटो शेअर करत अभिनेत्रीने तिची हेल्थ अपडेट चाहत्यांना दिली आहे. पोस्टमध्ये रश्मिका म्हणते, ” मित्रांनो तुम्ही कसे आहात? मला माहित आहे की, मी गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर फारशी सक्रिय नाहीये. त्याच कारण असं की, माझा गेल्या महिन्यात ॲक्सिडंट झाला होता. बरं वाटण्यासाठी आणि आरामाची गरज असल्याने मला डॉक्टरांनी बेड रेस्टचा सल्ला दिला होता.”
“मी आता बरी आहे. सध्या मी सुपर ॲक्टिव्ह होण्याच्या टप्प्यात आहे. त्यामुळे मला सध्या तुमच्या शुभेच्छांची गरज आहे, मला शुभेच्छा द्या. कायमच स्वतःच्या हेल्थला प्राधान्य द्या. आयुष्य खूपच नाजूक आणि लहान आहे आणि आपल्याला उद्या मिळेल की नाही हे माहित नाही म्हणून दररोज आनंदात जगा…” गेल्या काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री परळीला मंत्री धनंजय मुंडेंच्या कार्यक्रमाला गेली होती. अभिनेत्रीच्या ह्या पोस्टवर नेटकरी तिच्या तब्येतीची काळजी घेताना दिसले.