(फोटो सौजन्य-Social Media)
दीपिका पदुकोणने ८ सप्टेंबरला एका सुंदर मुलीला जन्म दिला. यासोबतच रणवीर सिंगची अनेक वर्षांची इच्छा पूर्ण झाली. अभिनेत्रीने मुंबईतील दक्षिण एचएन रिलायन्स रुग्णालयात बाळाला जन्म दिला. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी या दोघांना या हॉस्पिटलमध्ये भेट दिली आहे. तसेच अभिनेत्रींच्या मुलीला भेटून तिला आशीर्वाद दिला आहे.
मुलीला पाहण्यासाठी मुकेश अंबानी हॉस्पिटलमध्ये पोहोचले
मुकेश अंबानी यांचे दीपिका आणि रणवीरसोबत बॉन्डिंग चांगले आहे. याची झलक अनंत अंबानींच्या लग्नाच्या निमित्ताने पाहायला मिळाली. आता या सगळ्यात उधोजक दीपिका आणि रणवीरच्या मुलीला भेटायला आणि तिला आशीर्वाद देण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहचले. तसेच त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये अंबानींची गोल्डन कार आधी जाते आणि अनेक वाहनांचा ताफा त्यांच्या गाडीच्या मागून जाताना दिसत आहे.
Mukesh Ambani made a late night visit to H.N. Reliance Hospital to meet Deepika, Ranveer and their baby.#DeepikaPadukone #RanveerSingh pic.twitter.com/4oLdspp7PN
— Deepika Padukone Fanpage (@DeepikaAccess) September 10, 2024
अलीकडेच रणवीर सिंगची बहीण रितिका भवनानीही तिच्या लाडक्या भाचीला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचली होती. दीपिका आणि रणवीरने अद्याप त्यांच्या मुलीच्या नावाबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. दोघांनीही संयुक्त निवेदनाद्वारे आपल्या बाळाचे स्वागत केले. यानंतर अनेक बॉलिवूड स्टार्सनी अभिनेत्याचे या पोस्टवर अभिनंदन केले.
हे देखील वाचा- ‘इमर्जन्सी’च्या चर्चेदरम्यान कंगना रणौतने वादग्रस्त मालमत्ता विकली, 12 कोटींचा झाला फायदा!
कामाच्या आघाडीवर, रणवीर सिंग लवकरच सिंघम अगेन या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय त्याचा डॉन 3 हा चित्रपटही सध्या चर्चेत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत कियारा अडवाणी मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. दीपिका अखेरची कल्की 2989 एडी या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि प्रभाससोबत दिसली होती. याशिवाय सिंघम अगेनमध्ये ती लेडी सिंघमच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटामधील तिचे शूटिंग आधीच पूर्ण झाले आहे. सध्या अभिनेत्री मार्च 2025 पर्यंत प्रसूती रजेवर आहे. यानंतर ती कल्की पार्ट 2 चे शूटिंग सुरू करणार आहे.