संम्युक्ता मेननचं बॉलिवूडमध्ये पदार्पण, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीसोबत करणार स्क्रिन शेअर
अभिनेत्री संम्युक्ता मेनन (Samyuktha Menon) टॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक… मल्याळम, तेलुगू आणि तामिळ चित्रपटांतून प्रकाशझोतात आलेली संम्युक्ता आता लवकरच बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करणार आहे. अभिनेत्री आता लवकरच ‘महाराणी’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात ती काजोलसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. ह्या ॲक्शन-ड्रामा चित्रपटामध्ये संम्युक्ताची भूमिका अतिशय खास आणि दमदार असणार आहे. यावरून ती कोणत्याही भाषेत तिच्या कलेने सर्वांची मने जिंकू शकते हे दिसून येतेय.
भाषांच्या सीमा ओलांडून काम करणाऱ्या कलाकारांना सामावून घेण्यासाठी भारतीय चित्रपटसृष्टी आता सज्ज झाली आहे. संम्युक्ता याचे उत्तम उदाहरण आहे. मल्याळम, तामिळ, तेलुगू आणि कन्नड चित्रपटांमध्ये चमकदार काम केल्यानंतर संम्युक्ता आता ‘महाराणी’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. संम्युक्ताचे बॉलिवूडमध्ये डेब्यू हे दर्शवते की इंडस्ट्री आता भाषेतील अडथळे दूर करत आहे आणि प्रतिभा जोडत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत संयुक्ता म्हणाली, “माझा नेहमीच विश्वास आहे की कथा कथन करण्याची कला प्रत्येकाची असते आणि अभिनयाला कोणतीही मर्यादा नसते. या प्रोजेक्टमुळे माझा विश्वास आणखी दृढ होतोय.”
तिची प्रत्येक पात्रे खोलवर आणि भावनांनी साकारणारी संयुक्ता आज प्रादेशिक आणि बॉलिवूड चित्रपटांना जोडणारा दुवा बनत आहे. बॉलिवूड संपूर्ण भारतातील प्रेक्षकांशी जोडण्याचा प्रयत्न करत असताना, संयुक्ता या बदलाचे नेतृत्व करत आहे आणि भारतीय चित्रपटसृष्टीला एकत्रित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. संम्युक्ता मेननबद्दल सांगायचे तर, तिने मल्याळम, कन्नड, तामिळ, तेलुगू आणि हिंदी भाषेतील चित्रपटांत काम करत आहे. आता लवकरच ती ‘महाराणी’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तिने लोकप्रिय चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारली असून तिच्या अभिनयाचे चाहते कौतुक करीत आहेत. दरम्यान, अभिनेत्री कायमच इन्स्टाग्रामवर सक्रिय असते.