हॉरर कॉमेडी 'स्त्री ३' केव्हा येणार? राजकुमार रावने केलेल्या खुलाशामुळे चाहत्यांमध्ये निराशा; नेमकं अभिनेता काय म्हणाला
अमर कौशिक दिग्दर्शित ‘स्त्री’ आणि ‘स्त्री २’चा बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये समावेश झाला आहे. हे दोन्हीही चित्रपट वेगवेगळ्या वर्षांमध्ये रिलीज झालेले चित्रपट आहेत. राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर स्टारर ‘स्त्री २’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला १५ ऑगस्टला आला होता. चित्रपटाने रिलीज झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड्स मोडित काढले. २०२४ मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत ह्या चित्रपटाचा समावेश झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांना आतुरता आहे ती ‘स्त्री ३’ची… ‘स्त्री ३’बद्दल प्रेक्षकांना अभिनेता राजकुमार रावने महत्वाची अपडेट दिली आहे.
अभिनेता राजकुमार रावने नुकतेच ‘न्यूज १८’ला मुलाखत दिली आहे. त्याने दिलेली माहिती ऐकून चाहते निराश झाले आहेत. ” ‘स्त्री’चा सिक्वेल यायला ६ वर्ष लागली. प्रेक्षकांना ‘स्त्री ३’साठीही आणखी बरेच दिवस वाट पहावी लागणार आहे. ‘स्त्री ३’ नक्कीच येणार, पण अद्याप त्याची कोणतीही तयारी झालेली नाही. ‘स्त्री’च्या सिक्वेलच्या यशाचा झटपट फायदा घेण्याऐवजी चांगली फिल्म बनवण्याचा आमचा प्रयत्न असेल. ‘स्त्री’नंतर ‘स्त्री २’ बनवायला ६ वर्षांचा गॅप लागला. चांगल्या दर्जाची कलाकृती बनवायला काही वेळ लागतोच. कदाचित ‘स्त्री ३’ काही वेळ घेण्याची शक्यता आहे, पण नक्कीच ‘स्त्री ३’ला ६ वर्ष तरी वेळ नाही लागणार. दिग्दर्शक अमर कौशिक, निर्माते दिनेश विजान आणि लेखकांची टीम चांगली स्टोरीवर लक्ष देत आहे. फ्रँचायजीची क्वॉलिटी तशीच राहण्यासाठी दिग्दर्शकांचा आणि निर्मात्यांचा फोकस आहे, ज्यामुळे नवा सिनेमा नवी उंची गाठेल.”
कॉमेडियन सुनील पालचे अपहरणकर्ते कॅमेऱ्यात कैद, मेरठमध्ये खंडणीच्या पैशातून सोने खरेदी!
‘स्त्री २’ चित्रपटाने गेल्या काही दिवसांपूर्वी आपल्या नावावर एक विक्रम रचला होता. ‘स्त्री २’ने ‘जवान’ला मागे टाकलं आहे. चित्रपटाने देशभरात ५८६ कोटींपेक्षा अधिक कमाई करत शाहरूखच्या ‘जवान’ मागे टाकलं. किंग खानच्या ‘जवान’ चित्रपटाने हिंदी भाषेत एकूण ५८२ कोटींची कमाई केलेली आहे. चित्रपट रिलीज होऊन अनेक दिवस झाले असले तरीही चित्रपटाच्या लोकप्रियतेत काहीच फरक पडत नाहीये. दरम्यान, चित्रपटाचा बजेट ५० कोटींच्या आसपासचा आहे. चित्रपटाने देशात ६०८ कोटींची कमाई केलेली आहे. तर जगभरात चित्रपटाने ८२६. १५ कोटींची कमाई केलेली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन अमर कौशिकने केले असून चित्रपटाची निर्मिती मॅडॉक फिल्म्सने केली आहे. श्रद्धा कपूर, राजकुमार राव आणि पंकज त्रिपाठी प्रमुख भूमिकेत आहेत. तर, वरुण धवन, अक्षय कुमार आणि तमन्ना भाटियाने चित्रपटामध्ये कॅमियो रोल साकारला आहे.