sharmila tagore
बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर (Sharmila Tagore) पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. तब्बल ११ वर्षांनी शर्मिला टागोर ‘गुलमोहर’ (Gulmohar) या चित्रपटातून कमबॅक करणार आहेत. शर्मिला टागोर यांनी एक काळ खूप गाजवला. दरम्यान एका मुलाखतीत शर्मिला टागोर यांना जेव्हा त्यांच्या चित्रपटांवर नातवांची काय प्रतिक्रिया होती असे विचारण्यात आले. यावर शर्मिला टागोरने म्हणाल्या की, इनायाने एकदा खास मेसेजद्वारे त्यांचे अभिनंदन केले होते. दरम्यान शर्मिला टागोर यांनी सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि करीना कपूरच्या (Kareena Kapoor Khan) मुलांबद्दलही एक मोठा खुलासा केला आहे.
[read_also content=”जयप्रभा स्टुडिओ शुटींग साठी खुलं करा, अन्यथा आत्मदहन! अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा इशारा https://www.navarashtra.com/maharashtra/all-india-marathi-film-corporation-demandting-to-open-jayprabha-studio-for-shooting-nrps-281387.html”]
शर्मिला टागोर म्हणाल्या की, तैमूर आणि जेह या दोघांनाही माझे चित्रपट पाहण्याची परवानगी नाही. कारण तैमूर आणि जेहने जर मला ऑनस्क्रीन पाहिले तर त्या दोघांसाठी खूप कठीण जाईल. असं त्यांच मत आहे. सारा अली खान आणि इब्राहिम अली खान जेव्हा कधी शर्मिला टागोर यांचे चित्रपट पाहतात तेव्हा दोघेही फक्त ‘वेल डन’ म्हणतात. कारण दोघांकडेही चित्रपट पाहिल्यानंतर बोलण्यासारखं काहीच नसतं. असंही त्या म्हणाल्या. शर्मिला यांच्या चित्रपटांवर मिळणारी ही प्रतिक्रिया या दोन पिढ्यांमधील अंतरामुळे असल्याचे म्हटले जात आहे.
‘गुलमोहर’ चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर शर्मिला टागोर व्यतिरिक्त या चित्रपटात मनोज बाजपेयी, अमोल पालेकर, सूरज शर्मा आणि सिमरन ऋषी बग्गा हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ‘गुलमोहर’ हा एक सर्वसमावेशक कौटुंबिक चित्रपट असून तो ऑगस्ट २०२२ मध्ये थेट ओटीटीवर प्रदर्शित होईल. शर्मिला टागोर शेवटच्या २०१० मध्ये आलेल्या ‘ब्रेक के बाद’ या चित्रपटात दिसल्या होत्या. गुलमोहर चित्रपटाची कथा बत्रा कुटुंबाच्या अनेक पिढीभोवती फिरते.