Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्मिता तांबे दिसणार एका वेगळ्या भूमिकेत, ‘लगन’ चित्रपट ६ मे रोजी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

अभिनेत्री स्मिता तांबे (Smita Tambe) आता आपल्या सगळ्यांना ‘लगन’ (Lagan) या मराठी चित्रपटातून भेटणार आहे. हा चित्रपट ६ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राधा (Radha) असं स्मिताच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे.

  • By साधना
Updated On: Apr 18, 2022 | 07:08 PM
smita tambe photo

smita tambe photo

Follow Us
Close
Follow Us:

अभिनेत्री स्मिता तांबे (Smita Tambe)चित्रपट, मालिका, वेबसिरीज या माध्यमांतून वेगवेगळ्या भूमिका करत आपल्या अभिनयाच्या छटा दाखवत असते. स्मिता आता आपल्या सगळ्यांना ‘लगन’ (Lagan) या मराठी चित्रपटातून भेटणार आहे. हा चित्रपट ६ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

राधा (Radha) असं स्मिताच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे. खेडयात राहणारी ऊसतोडणी करणाऱ्या कामगाराची भूमिका स्मिताने साकारली आहे. कणखर तरीही सोज्वळ अशा छटा या व्यक्तिरेखेच्या आहेत. स्मिताचा खेडवळ लूक यामध्ये दिसणार आहे. या व्यक्तिरेखेसाठी स्मिताने स्वत: बैलगाडी चालवली आहे. ऊसाच्या भल्यामोठया मोळया डोक्यावर घेत उन्हातान्हात शूटिंग केलं आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या गावांतून चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले आहे.

[read_also content=”कल्याण डोंबिवलीमध्ये पाणी प्रश्नावर मनसे आणि भाजप आक्रमक, पालिका मुख्यालयावर धडकला तहान मोर्चा https://www.navarashtra.com/maharashtra/mns-and-bjp-protest-on-kdmc-for-water-issue-in-city-nrsr-270595.html”]

तिच्या भूमिके विषयी बोलताना स्मिता म्हणाली, “हे पात्र साकारणं माझ्यासाठी आनंददायी आणि तेवढंच आव्हानात्मक होतं. आपल्या लेकरासाठी काहीही करण्याची प्रत्येक आईची धडपड असते. हे पात्र साकारताना, प्रत्येक आईची ती तळमळ दाखवणं, एवढंच मी या माझ्या भूमिकेतून केलं आहे. तसेच या चित्रपटाच्या निमित्ताने गावातील जीवनपद्धती पुन्हा एकदा जवळून बघता आली याचा ही आनंद आहे”.

प्रेम माणसाला स्वत:च्या पलीकडे पहायची शक्ती देतं. प्रेमात पडणं जेवढं आनंददायी असतं तितकंच समर्थपणे प्रेम निभावणं अवघड असतं, प्रेमामुळंच नाती जोडली आणि तोडलीही जातात. अडचणींवर मात करत प्रेमाची साथ निभावणार्‍या अनोख्या प्रेमाची गोष्ट ‘लगन’ चित्रपटात ६ मे ला पहायला मिळणार आहे. ‘लगन’ चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन अर्जुन गुजर यांनी केलं आहे. जी.बी.एंटरटेनमेंट यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.

Web Title: Actress smita tambe will be seen in lagan movie nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2022 | 06:19 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.