बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) हिने काहीच दिवसांपूर्वी गोंडस मुलीला जन्म दिला. नव्या पाहुण्यामुळे कपूर कुटुंबात आनंदी आनंद झाला आहे. आलिया आणि रणबीर कपूरच्या मुलीची एक झलक पाहण्यासाठी सध्या सर्व चाहते उत्सुक आहेत. अशातच आलियाने तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केला आहे.
आलियाने लेकीच्या जन्मानंतर पहिला फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या फोटोत आलियाचा चेहरा ब्लर दिसत असून तिच्या हातातील कॉफी मग दिसत आहे. कॉफी मगवर ‘mama’ म्हणजेच आई असं लिहिलेलं आहे. हा फोटो शेअर करत आलियाने ‘ही मी’ असं कॅप्शन लिहिलं आहे. या फोटोंवर अनेकांनी कमेंट्स करून लाईक्स केले आहे. अभिनेते टायगर श्रॉफने आलियाच्या या पोस्टवर ‘Cute’ असे लिहिले आहे. तर झोया अख्तरने “baby” आणि मनीष मल्होत्राने हार्ट इमोजी देऊन प्रेम व्यक्त केले आहे.