Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Don’t Be Shy लंडनमध्ये चर्चेचा विषय; आलिया भट्ट आणि निखिल मधोक एकत्र, महिला-केंद्रित कथेला जागतिक व्यासपीठ

आलिया भट्टचा ‘Don't Be Shy’ लंडनमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. महिला दृष्टिकोनातून साकारलेला हा चित्रपट प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार असल्याचे समजले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 13, 2026 | 12:49 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • Don’t Be Shy लंडनमध्ये चर्चेचा विषय
  • आलिया भट्ट आणि निखिल मधोक एकत्र
  • महिला-केंद्रित कथेला जागतिक व्यासपीठ
 

प्राइम व्हिडिओ आणि इटर्नल सनशाइन प्रोडक्शन्स यांच्या सहकार्याने साकारत असलेल्या Don’t Be Shy या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय पातळीवरही आपली छाप पाडली आहे. १२ फेब्रुवारी रोजी लंडन येथे झालेल्या पहिल्या ‘Prime Video Presents: International Originals’ या विशेष कार्यक्रमात आलिया भट्ट आणि निखिल मधोक एकत्र मंचावर दिसले आहे. विशेष म्हणजे, या कार्यक्रमात सादर करण्यात आलेला ‘डोंट बी शाय’ हा एकमेव भारतीय चित्रपट होता, ज्याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

चर्चेदरम्यान या चित्रपटातील पात्रांची मांडणी खास ‘फीमेल गेज’ म्हणजेच महिला दृष्टिकोन लक्षात घेऊन असे करण्यात आले आहे, यावर सविस्तर चर्चा झाली. कथानक २० वर्षांच्या श्यामिली ‘शाय’ दास हिच्या आयुष्याभोवती फिरते. स्वतःचे आयुष्य पूर्णपणे नियंत्रणात असल्याची खात्री बाळगणाऱ्या शायला एका अनपेक्षित वळणामुळे आयुष्य नव्याने समजून घ्यावे लागते. या प्रवासात तिची भावनिक, वैयक्तिक आणि नातेसंबंधातील वाढ प्रेक्षकांसमोर उलगडत जाते.

अजय देवगण यांच्या दमदार आवाजात ‘शतक – संघ के १०० वर्ष’ ट्रेलर रिलीज; जाणून घ्या कधी होणार चित्रपट प्रदर्शित

महिला पात्रांविषयी बोलताना आलिया भट्ट म्हणाली की, ताकदीच्या आणि प्रभावी महिला पात्रांकडे त्यांचा नैसर्गिक कल असतो. मात्र, या चित्रपटात दोन पुरुष पात्रांनाही अत्यंत वेगळ्या आणि ताज्या दृष्टिकोनातून सादर करण्यात आले आहे, ज्यामुळे कथा अधिक समतोल आणि आकर्षक बनली आहे. त्यांच्यानुसार, चित्रपटात क्लासिक टोन आणि आधुनिक आवाज यांचा सुंदर संगम आहे. दिग्दर्शक स्रीती मुखर्जी यांच्या स्वतंत्र शैलीमुळे चित्रपटाला एक वेगळी ऊर्जा प्राप्त झाली आहे आणि प्रेक्षकांसाठी यात एक मोठे आश्चर्य दडलेले आहे.

‘Prime Video India’चे डायरेक्टर आणि हेड ऑफ ओरिजिनल्स निखिल मधोक यांनीही या प्रकल्पामागील विचार स्पष्ट केला. त्यांच्या मते, ‘फीमेल-फर्स्ट’ कथानकांना प्रोत्साहन देणे ही त्यांची सातत्यपूर्ण भूमिका राहिली आहे. सक्षम, सूक्ष्मतेने लिहिलेली आणि स्वतःचे निर्णय घेण्याचा अधिकार असलेली महिला पात्रे हे या कथानकाचे वैशिष्ट्य आहे. त्याचबरोबर कॅमेऱ्यासमोर आणि कॅमेऱ्यामागे नव्या प्रतिभेला संधी देणे हीसुद्धा महत्त्वाची बाब आहे. ‘शाय’चे पात्र ज्या संवेदनशीलतेने लिहिले गेले आहे, त्यामुळे हा चित्रपट अनेक स्तरांवर त्यांच्याशी जोडला गेला, असे त्यांनी सांगितले.

‘Alpha’च्या सेटवर एकमेकांना भिडले आलिया आणि बॉबी; दिग्दर्शक आदित्य चोप्राने घेतला मोठा निर्णय

आलिया भट्ट आणि शाहीन भट्ट यांच्या इटर्नल सनशाइन प्रोडक्शन्स या बॅनरखाली, तसेच ग्रिश्मा शाह आणि विकेश भुतानी यांच्या सहनिर्मितीत हा चित्रपट साकारला आहे. लेखन आणि दिग्दर्शन स्रीती मुखर्जी यांनी केले असून, कथा, व्यक्तिरेखा आणि मांडणी यामध्ये नव्या पिढीचा आत्मविश्वास आणि भावनिक प्रामाणिकपणा जाणवतो आहे. ‘डोंट बी शाय’ हा आगामी ओरिजिनल चित्रपट प्राइम व्हिडिओवर भारतासह जगभरातील २४० हून अधिक देश आणि प्रदेशांमध्ये विशेष प्रीमियर होणार आहे. महिला दृष्टिकोनातून सांगितलेली ही तरुणाईची कथा जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी सज्ज झाली आहे.

Web Title: Alia bhatt says dont be shy uses the female gaze to look at things opens up on how film differs amazon prime video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2026 | 12:49 PM

Topics:  

  • aalia bhatt
  • Bollywood
  • entertainment

संबंधित बातम्या

Shekhar Tonight : १४ वर्षांनंतर शेखर सुमन पुन्हा सज्ज; ‘शेखर टुनाइट’मधून रंगणार अनफिल्टर्ड संवाद
1

Shekhar Tonight : १४ वर्षांनंतर शेखर सुमन पुन्हा सज्ज; ‘शेखर टुनाइट’मधून रंगणार अनफिल्टर्ड संवाद

Abhang Tukaram : टाळ-मृदंगाच्या गजरात आता OTTवर तुकोबांची गाथा, ‘अभंग तुकाराम’चा दमदार ट्रेलर रिलीज!
2

Abhang Tukaram : टाळ-मृदंगाच्या गजरात आता OTTवर तुकोबांची गाथा, ‘अभंग तुकाराम’चा दमदार ट्रेलर रिलीज!

Anupam Kher : ‘जिथे राजने सिमरनचा हात धरला…’ त्या ऐतिहासिक ठिकाणी पोहोचले अनुपम खेर; महाराष्ट्र सरकारकडे केली खास मागणी
3

Anupam Kher : ‘जिथे राजने सिमरनचा हात धरला…’ त्या ऐतिहासिक ठिकाणी पोहोचले अनुपम खेर; महाराष्ट्र सरकारकडे केली खास मागणी

Detective Dhananjay : थरार, कुतूहल आणि शिस्तबद्ध शूटिंग; मराठी OTT मालिकेबद्दल दिग्दर्शकाचे खुलासे
4

Detective Dhananjay : थरार, कुतूहल आणि शिस्तबद्ध शूटिंग; मराठी OTT मालिकेबद्दल दिग्दर्शकाचे खुलासे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.