72 hoorain trailer
सेन्सॉर बोर्डाने (CBFC) ‘72 हुरें’च्या (72 Hoorain) ट्रेलरमध्ये आक्षेपार्ह घटना दाखवल्याचं सांगत याच्या रिलीजला नकार दिला. मात्र निर्माते मागे हटले नाही. त्यांनी या चित्रपटाचा ट्रेलर डिजिटल प्लॅटफॉर्मवर आज रिलीज केला आहे. (72 Hoorain Trailer)
चित्रपटाचा ट्रेलर दहशतवादाच्या काळ्या जगातलं भयाण वास्तव दाखवणारा आहे. ट्रेलरमध्ये हे दाखवण्यात आलं आहे की, दहशतवादी आधी कसं ब्रेनवॉश करतात आणि त्यानंतर लोकांना मारण्यासाठी त्यांना प्रवृत्त करतात. दहशतवादी असं म्हणतात की, जो माणूस स्वत:चा जीव पणाला लावून लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त करतो त्याला देव स्वर्गात जागा देतो.
‘72 HOORAIN’ TRAILER OUT NOW… Team #72Hoorain – directed by #NationalAward winner #SanjayPuranSinghChauhan– launches the trailer of the film, which arrives in *cinemas* on 7 July 2023.#72HoorainTrailer ?: https://t.co/cB0auDvzFh#72Hoorain is produced by #GulabSinghTanwar,… pic.twitter.com/zTH6cZZiqO
— taran adarsh (@taran_adarsh) June 28, 2023
सेन्सॉर बोर्डाचं म्हणणं काय?
CBFC च्या मते, त्यांना प्रेक्षकांच्या भावनांचा विचार करावा लागतो. त्यामुळे ट्रेलरला ग्रीन सिग्नल देता येणार नाही. दुसरीकडे अशोक पंडित यांनी CBFC वर अनेक आरोप करत आपला राग व्यक्त केला आहे.
सहनिर्मात्यांनी सेन्सॉर बोर्डाला विचारले प्रश्न ?
पत्रकार परिषदेमध्ये चित्रपटाचे सहनिर्माते अशोक पंडित यांनी सांगितलं की, एक गोष्ट समजणं आवश्यक आहे की फिल्मचं सेन्सॉर वेगळं असतं आणि ट्रेलरचं सेन्सॉर वेगळं असतं. त्याबाबत तांत्रिक काम करणाऱ्याला विचारावं लागेल. चित्रपटासाठीचं सेन्सॉरचं सर्टिफिकेट माझ्याकडे आहे. आम्हाला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. आता तुम्ही जो ट्रेलर बघताय त्यात एका पायाचा शॉट आहे जो ट्रेलरमधून काढण्यात आला आहे. सेन्सॉर बोर्डाने तो लास्ट सिक्वेन्स काढायला लावला. मात्र विरोधाभास असा आहे की तो शॉर्टफिल्ममध्ये आहे आणि त्याला परवानगी मिळाली आहे. त्याला सेन्सॉरचं सर्टिफिकेट मिळालं आहे. पण ट्रेलरमधून तो काढायला लावलाय. आम्ही त्याविषयी प्रश्न विचारत आहोत.
दुसरं त्यांनी सांगितलं की, कुराणचा शब्द काढा. तोसुद्धा चित्रपटात आहे. तो एक संपूर्ण डायलॉग आहे. मी एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो की, हा चित्रपट कोणत्याही धर्म किंवा मानवतेविरोधात नाही. सामान्यवादाचा हा लढा आहे. आम्ही आयत्यावेळी आमचा ट्रेलर लॉन्च करतोय. जे तुम्हाला चित्रपटात चालतं ते ट्रेलरमध्ये का चालत नाही ? आम्ही ट्रेलर रिलीज करतोय त्याला तुमचा आक्षेप आहे .
मंत्री अनुराग ठाकूर यांना देणार निवेदन
यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांची आम्ही मदत मागू. आम्ही मंत्री अनुराग ठाकूर यांना निवेदन करणार आहोत की त्यांनी या प्रकरणाची चौकशी करावी. राष्ट्रीय पुरस्कार जिंकणाऱ्या चित्रपटाच्या ट्रेलरला सेन्सॉर विरोध करतंय. सेन्सॉर बोर्डाला कोण बदनाम करतंय ? आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे.
सत्य घटनांवर आधारित सिनेमा
या चित्रपटाच्या टीझरवर आक्षेप घेण्यात आला नव्हता. त्यात खरंतर हाफिज सईद, ओसामा बिन लादेन, मसूद अजहर आणि याकूब मेनन अशा दहशतवाद्यांचा आवाज वापरण्यात आला होता. त्यात असं दाखवण्यात आलं होतं की, दहशतवादी तरुणांना स्वर्गात ‘72 हुरें’ मिळतील असं आमिष दाखवून त्यांना जिहादसाठी तयार करत आहेत. हा चित्रपट सत्यकथेवर आधारित आहे. हा चित्रपट 7 जुलैला रिलीज होणार आहे.