alia bhatt in gangubai kathiawadi
गंगुबाई का ? एका मुख्य अभिनेत्रीसाठी ही वेगळ्या प्रकारची निवड आहे. या रोलसाठी कशी तयारी केली ?
उत्तर – गंगुबाईने परिस्थितीमध्ये बदल घडवून आणले आणि स्वत:साठी एक सुंदर जीवनाची वाट तयार केली. तिला कोणत्याही गोष्टींची लाज वाटत नसली तरी ती एक संवेदनशील व्यक्ती आहे. ती कठोरही आहे आणि नाजूकही आहे. स्वार्थीपण आहे आणि निस्वार्थीपण आहे. हे विचित्र कॉम्बिनेशन खरोखर आश्चर्यकारक आहे. या भावना कशा दाखवाव्या याबद्दल माझ्या मनात उत्सुकता होती. ती ज्या जगातून आली तिथे मी कधी पाऊलही ठेवलेलं नाही. संजय सरांच्या सगळ्या सूचना मी तंतोतंत पाळल्या. हीच माझी तयारी होती. आम्ही गंगुबाईच्या पार्श्वभूमीपासून सुरुवात केली जिथे ती फक्त गंगू होती आणि गंगुबाई बनली नव्हती. मी रिसर्चसाठी हुसैन जैदींचं पुस्तक वाचलं. या विषयावरचे अनेक चित्रपट बघितले. चेहऱ्यावरचे हावभाव आणि बॉडी लँग्वेज समजण्यासाठी माहितीपट बघितले. गुजराती काठियावाडी भाषा मला शिकावी लागली. कारण ती त्या भूमिकेची गरज होती. भूमिकेशी एकरुप होण्यासाठी हे सगळं आवश्यक होतं आणि मी ते केलं. संजय सर ही जेव्हा मी या भूमिकेशी समरसून गेले तेव्हा घेतलेल्या सीन्सवर खूप खूश होते. हा अनुभव माझ्यासाठी जीवनातला सर्वात समाधानकारक अनुभव होता.
गंगुबाईसारख्या बिनधास्त महिलेची भूमिका केल्यावर जीवनात काय फरक पडला ? या भूमिकेतून तुम्ही काय शिकलात ?
उत्तर – मी अजूनही स्वत:ला गंगुबाईपासून वेगळं केलेलं नाही. गंगुबाईला संपूर्ण ताकदीनिशी गुंतागुंतींच्या घटनांसह सादर करणं कठीण होतं. ते एक इमोशनल कॅरेक्टर होतं. त्या काळच्या स्थितीबाबत त्यांच्या मनात खूप राग होता. एक माणूस म्हणून गंगुबाईने माझं आयुष्य पूर्णपणे बदललं. आयुष्यात आलेल्या प्रत्येक संकटातून गंगुने स्वत:ला बाहेर काढलं. तिने कधीच हार मानली नाही. लोक काय म्हणतील याचा विचार गंगु करत नाही. ती स्वत:विषयी अत्यंत प्रामाणिक आहे. तिचं मत ती लोकांपर्यंत पोहोचवते. या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. ती इतर गोष्टींची काळजी करत नाही. सगळ्यांवर प्रेम करते. मला हे सगळे गुण आवडतात.
गंगूबाई चित्रपटात प्रत्येक गोष्ट बारकाईने लक्ष घालून करण्यात आली आहे. संजय लिला भन्साळींची नायिका म्हणून काम करतानाचा हा अनुभव कसा होता ? तुम्ही याचा स्वीकार कसा केला ?
उत्तर – ही मी नाही आणि मला माहित असलेले जग ते नक्कीच नाही. स्वतःहून खूप वेगळं कॅरेक्टर उभं करण्यासाठी मला माझं सर्वस्व द्यावं लागलं. मला वयाच्या नवव्या वर्षापासून संजय लिला भन्साळी सरांची हिरोईन व्हायचं होतं. हे स्वप्न गंगुबाई काठियावाडी चित्रपटामुळे सत्यात उतरलं. सरांसोबत काम करणं नेहमीच अनेक प्रकारे आव्हानात्मक असतं पण ते सर्जनशीलतेच्या, मानसिक आणि शारीरिक दृष्टिकोनातूनही समाधानकारकही असते. सरांनी पडद्यावर आणलेली भव्यता, नाट्य आणि गुंतागुंतीचे तपशील मांडण्याची त्यांची पद्धत अवर्णनीय आहे. त्यांच्या कामामुळे मी नेहमीच थक्क होते आणि त्यांच्या संस्कृतीच्या सुंदर चित्रणाबद्दल मला त्यांचा खूप आदर आहे.