"हार गये तो क्या ? जीतते रहे तो..." ; अमिताभ बच्चन यांनी लिहिलेली क्रिप्टिक पोस्ट तुफान व्हायरल
बिग बी अमिताभ बच्चन यांनी आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर चाहत्यांचे मन जिंकले आहे. वयाच्या ८२ व्या वर्षीही त्यांनी आपल्या कामाचा करिश्मा कायम ठेवत बॉलिवूडमध्ये स्वत:चं नाव नेहमीच चर्चेत ठेवलं आहे. बिग बी शेवटचे ‘कल्की २८९८ एडी’चित्रपटामध्ये दिसले होते. त्यानंतर ते ‘कौन बनेगा करोडपती’च्या १६ व्या सीझनमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या शोमध्येही बिग बी येणाऱ्या स्पर्धकांसोबत दिलखुलास चर्चा करताना दिसतात. कायमच सोशल मीडियावर बिग बी सक्रिय असतात. ते नेहमीच आपल्या पोस्टच्या माध्यमातून फॅन्समध्ये चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतात.
हे देखील वाचा – कार्तिक आर्यन कधी करणार लग्न? चाहत्यांच्या प्रश्नाला अभिनेत्याने दिले जबरदस्त उत्तर!
काही तासांपूर्वीच बिग बींनी एक्सवर क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे. शेअर केलेल्या ह्या पोस्टवर त्यांनी जय- पराजयावर परखड भाष्य केलं आहे. शेअर केलेल्या पोस्टवर बिग बींनी लिहिलंय, “हरलो तर काय झालं ? जिंकण्याचं लक्ष साध्य झालं… कायमच जिंकत राहिलो तर प्रगतीचे ध्येय कसे गाठणार ?” पोस्ट व्यतिरिक्त बिग बींनी ब्लॉगमध्ये त्यांच्या दररोजच्या शेड्यूलबद्दलही सांगितलं आहे. त्यांनी लिहिलंय की, आज पुन्हा उशीर झाला, मध्यरात्री २ वाजता शुटिंग आटोपलंय आणि आता सकाळी ८ वाजता पुन्हा शुटिंगला निघालोय. उशीर झाल्याबद्दल माफी मागतो… अधिकची माहिती मी तुम्हाला उद्या सांगेन…
T 5185 – हार गये तो क्या ? जीतने का लक्ष बन गया !! जीतते रहते तो, बढ़ने का लक्ष कैसे बनता !!
— Amitabh Bachchan (@SrBachchan) November 6, 2024
अमिताभ बच्चन ‘कौन बनेगा करोडपती’च्या १६ व्या सीझनच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. गेले अनेक सीझन बिग बी या शोचं होस्टिंग करताना पाहायला मिळत आहे. बिग बी या शोमुळे नेहमीच चर्चेत राहत असून या शोच्या माध्यमातून ते प्रेक्षकांसोबत स्वत:च्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल भाष्य करताना दिसतात. अलीकडेच, अभिनेता वरुण धवन आणि दिग्दर्शक राज आणि डीक ‘सिटाडेल हनी बनी’ सीरीजच्या प्रमोशननिमित्त प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. बिग बींच्या कामाबद्दल बोलायचे तर, ते शेवटचे वेट्टियान चित्रपटात दिसले होते ज्यात रजनीकांत देखील मुख्य भूमिकेत होते. आता बिग बी ‘सेक्शन 84’ चित्रपटात दिसणार आहेत ज्यात निम्रत कौर, अभिषेक बॅनर्जी आणि डायना पेंटी ही मुख्य भूमिकेत असतील.
हे देखील वाचा – ‘पुष्पाला घाबरला छावा’! पुष्पामुळे विकी कौशलच्या चित्रपटाची रिलीज डेट ढकलणार पुढे?