हैदराबाद: कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आधारित असलेला प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांचा चित्रपट ‘द वॅक्सीन वॉर’ (The Vaccine War) सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाच्या शूटींगला सुरुवात झाली आहे. मात्र, चित्रपटाच्या सेटवर अभिनेत्री पल्लवी जोशी यांना गाडीने धडक दिली. या अपघातात त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे.
[read_also content=”19 जानेवारीला मुंबईत पंतप्रधान मोदींची सभा, विविध प्रकल्पाचं होणार भूमिपूजन, खर्चाचा बोजा मात्र महापालिकेवर! https://www.navarashtra.com/maharashtra/prime-minister-modis-meeting-in-mumbai-on-january-19-inauguration-will-be-held-for-various-projects-but-the-burden-of-expenses-is-on-the-municipal-corporation-nrps-362247.html”]
‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) नंतर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा ‘द वॅक्सीन वॉर’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हैदराबादमध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरु आहे. या दरम्यान छोटासा अपघात झाला. शूटींग दरम्यान एका गाडीचे नियंत्रण सुटले आणि ती जाऊन पल्लवी जोशी यांना धडकली. मात्र, दुखापत होऊनही पल्लवी जोशीने चित्रपटाचा तो शॉट पूर्ण केला आणि नंतर त्यांना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात नेण्यात आलं. सध्या पल्लवी जोशी यांची तब्येत ठीक असल्याची माहिती आहे.
‘द कश्मीर फाइल्स’ मागच्या वर्षी रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटात अनुपम खेर यांच्यासोबतच दर्शन कुमार, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली. या चित्रपटाने बॅाक्स ऑफिसवर चांगलाच गाजला होता. हा सिनेमा प्रेक्षकांसोबत समिक्षकांच्याही पसंतीस उतरला होता. आता ‘द कश्मीर फाइल्स नंतर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री पुन्हा एका सामाजिक विषयावर सिनेमा घेऊ येत आहे. ‘द वॅक्सीन वॉर’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. द वॅक्सीन वॉर’ या चित्रपटात कोरोना महामारी दरम्यान देशातील परिस्थिती कशी होती, याचं वास्तववादी चित्रण पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांच्या टीमने तब्बल एक संपूर्ण वर्ष कोव्हिड परिस्थितीचं निरक्षण करून त्यावर संशोधन केलं आहे. या चित्रपटात पल्लवी जोश, नाना पाटेकर, कांतारा फेम अभिनेत्री सप्तमी गौडा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट तब्बल ११ भाषांमध्ये रिलीज होणार आहे.