(फोटो सौजन्य - x अकाउंट)
बॉलिवूड इंडस्ट्रीतून दु:खद बातमी समोर येत आहे. कपूर कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर आणि प्रसिद्ध बॉलिवूड सिनेनिर्माते बोनी कपूर यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अनिल कपूर आणि बोनी कपूर यांच्या मातोश्री निर्मल कपूर उर्फ सुचित्रा कपूर यांचे निधन झाले आहे. त्या ९० वर्षांच्या होत्या. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने कपूर कुटुंबीयांसह संपूर्ण बॉलिवूडवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
प्रसिद्ध अभिनेते अनिल कपूर, चित्रपट निर्माते बोनी कपूर आणि अभिनेता संजय कपूर यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. निर्मल यांच्या निधनामुळे कपूर ब्रदर्सच्या डोक्यावरील आईचे छत्र हरपले आहे. कपूर कुटुंबासह चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. गेल्या आठवड्याभरापासून अनिल यांच्या मातोश्रींवर मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची आज सायंकाळी प्राणज्योत मालवली. निर्मल कपूर यांचे आज २ मे २०२५ रोजी सायंकाळी साडे पाचच्या सुमारास कोकिलाबेन रुग्णालयात निधन झाले. अद्याप कोकिलाबेन रुग्णालयाकडून किंवा कपूर कुटुंबीयांकडून अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
दरम्यान, निर्मल कपूर यांचा जन्म २७ सप्टेंबर रोजी झाला. गेल्या वर्षी २०२४ मध्ये त्यांनी त्यांचा ९० वा वाढदिवस थाटामाटात साजरा केला होता. त्यावेळी अनिल कपूर यांनी सोशल मीडियावर आपल्या आईसोबतच्या खास आठवणींच्या फोटोंचे कोलाज शेअर केले होते. या फोटोंमध्ये अनिल कपूर यांच्यासोबत संजय आणि बोनी कपूरदेखील दिसत होते. यात संपूर्ण कुटुंब एकत्र खूप आनंदी दिसत होते. फोटोमध्ये अनिल कपूर यांची पत्नी सुनीता कपूर निर्मल यांच्या बाजूला बसलेल्या दिसत आहेत. शिवाय, बोनी कपूरची मुलगी जान्हवी कपूर आणि संजय कपूरची मुलगी शनाया कपूरही दिसत आहे. निर्मल कपूर यांच्या ९० व्या वाढदिवसाचा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
अनिल कपूर, बोनी कपूर आणि संजय कपूर यांच्या वडिलांचे नाव सुरिंदर कपूर असं होतं. त्याचे निधन २०११ मध्येच झाले होते. सुरिंदर कपूर पेशाने सिनेनिर्माते होते. १४ वर्षांपूर्वी तिनही भावांच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र हरपले, आणि आता आईचे छत्र हरपले. निर्मल कपूर यांच्या निधनाने संपूर्ण कपूर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सुरिंदर कपूर हे एकेकाळी कुटुंबासह पृथ्वीराज कपूरच्या गॅरेजमध्ये राहत होते. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी निर्मल कपूरही त्या गॅरेजमध्ये राहत होत्या. त्यांनी त्यांच्या मुलांचे योग्यरित्या संगोपन केले. आज त्यांची तिन्हीही मुलं बोनी, अनिल आणि संजय कपूर हे सिनेसृष्टीतील प्रतिष्ठित व्यक्ती आहे. ते तिघेही बॉलिवूडमध्ये सक्रीय आहेत.