फोटो सौजन्य - Social Media
अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी ९०च्या दशकापासून आतापर्यंत फार प्रसिद्ध राहिलेल्या अभिनेत्रींपेकी एक आहे. चित्रपटात तसेच मराठी मालिकांमध्ये आईच्या भूमिकेसाठी रोहिणी ओळखल्या जातात. दरम्यान, एका मुलाखतीत रोहिणी यांच्यावर अभिनेते अनुपम खेर यांनी केलेले आरोप समोर आले आहेत. या आरोपांचा खुलासा अभिनेत्री आणि लेखिका मुग्धा गोडबोले यांनी केले आहे. एका मुलाखतीत, रोहिणी आणि मुग्धा एकमेकांशी संवाद साधत असताना हा विषय समोर आला.
मुग्धा यांनी अनुपम खेर यांनी रोहिणी यांच्यावर केलेले आरोप मुलाखतीत मांडले, तो प्रसंग सांगताना. मुग्धा म्हणाली की, “मी रोहिणी यांच्यावर एक लेख लिहीत होते. त्यावेळी त्यांच्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी मी अभिनेते अनुपम खेर यांना कॉल केला होता. त्यावेळी तो कॉल त्यांच्या मॅनेजरने उचलला होता. कॉल करण्याचे कारण सांगत मला त्यांनी पुढच्या दिवसाची तारीख दिली. दुपारी दोन वाजता त्यांना पुन्हा कॉल करा असे सांगत मॅनेजरने फोन ठेवून दिला. पण काहीच क्षणात अभिनेते अनुपम खेर यांचा स्वतः कॉल आला. आम्ही जवळजवळ पाऊण तास संवाद केला.”
पुढे त्या म्हणाल्या की,”दरम्यान, अनुपम खेर यांनी रोहिणी ताईंवर काही आरोपही केले. त्यांचे म्हणणे होते की त्या फार उत्तम कलाकार आहेत. अभिनयात फार अग्रेसर आहेत परंतु या क्षेत्रात जितकं त्यांनी करायला हवं तितकं त्यांनी केलं नाही. त्या मालिकांमध्ये अडकून राहिल्या…” मुग्धा यांच्या मते अनुपम यांनी जरी तक्रार केली असली तरी त्यांनी फार मनापासून हे सार मांडलं होतं. त्यांच्या उद्देश रोहिणी यांना अभिनय क्षेत्रात आणखीन मोठ्या स्तरावर पाहण्याचा होता.
हिंदी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या ‘सारांश’ या चित्रपटात अभिनेते अनुपम खेर यांचासह अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी झळकल्या होत्या. तसेच मराठी जेष्ठ अभिनेते निळू फुले आणि सुहास भालेकर यांनीदेखील या चित्रपटात अभिनय केला होता.