(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
सध्या कियारा अडवाणीचे घर आणि आयुष्य आनंदाने भरलेले आहे. १५ जुलै रोजी कियारा आणि सिद्धार्थ मल्होत्रा एका मुलीचे पालक झाले आहेत. त्यांच्या मुलीच्या जन्मानिमित्त, कियारा आणि सिद्धार्थने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये लिहिले होते, ‘माझे जग कायमचे बदलले आहे. आम्हाला एक मुलगी झाली आहे.’ अलीकडेच, कियाराने तिच्या मातृत्वाच्या प्रवासाबद्दल सोशल मीडियावर एक पोस्ट देखील पोस्ट केली. ज्याला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद देत आहेत.
टायगर श्रॉफच्या ‘बागी ४’ च्या टीझरला मिळाले ‘A’ प्रमाणपत्र, ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट
कियाराने पोस्टमध्ये भावना केल्या व्यक्त
कियारा अडवाणीने एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आणि लिहिले की, ‘मी तुमचे डायपर बदलते, आणि तुम्ही माझे जग बदलले.’ हा एक योग्य व्यवहार आहे.’ असे लिहून अभिनेत्रीने ही पोस्ट शेअर केली आहे. तसेच, या पोस्टद्वारे कियारा तिचा मातृत्वाचा प्रवास चाहत्यांसोबत शेअर करताना दिसली आहे. पती सिद्धार्थ मल्होत्रा देखील कियाराला या मातृत्वाच्या प्रवासात पाठिंबा देत आहे. व्हायरल व्हिडिओंमध्ये अनेकदा सिद्धार्थ कियाराची खूप काळजी घेताना दिसून आला आहे.
(फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
‘वॉर २’ मध्ये कियारा अडवाणी देखील दिसणार
कियारा अडवाणी सध्या ब्रेकवर आहे, ती तिच्या मुलीला वाढवण्यात वेळ घालवत आहे. पण लवकरच ती ‘वॉर २’ चित्रपटात हृतिक रोशनसोबत दिसणार आहे. कियाराने या चित्रपटाचे चित्रीकरण आधीच करून घेतले होते. ‘वॉर २’ हा चित्रपट १४ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे. यामध्ये दक्षिणेचा सुपरस्टार ज्युनियर एनटीआर देखील दिसणार आहे.
‘War 2’ चे ॲडव्हान्स बुकिंग सुरू, निर्मात्यांनी चित्रपटाचा प्री-रिलीज प्रोमो देखील केला शेअर
कियारा अडवाणीचे आगामी चित्रपट
पुढील वर्षी केजीएफ फेम दक्षिणेचा अभिनेता यशच्या ‘टॉक्सिक’ चित्रपटात कियारा देखील दिसणार आहे. हा एक मेगा बजेट ॲक्शन ड्रामा चित्रपट असणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी मार्चमध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. तसेच अभिनेत्री मातृत्वाचे जीवन आनंदाने जगत असताना तिच्या चाहत्यांना देखील आनंद होत आहे.