Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मानवत मर्डर्स’मध्‍ये आशुतोष गोवारीकर प्रसिद्ध डिटेक्टिव्‍ह रमाकांत एस. कुलकर्णीच्‍या प्रमुख भूमिकेत

सोनी लिव्‍ह रोमांचक क्राइम थ्रिलर सिरीज ‘मानवत मर्डर्स' घेऊन येत आहे. ही सिरीज सर्वात भयानक ऐतिहासिक घटनेचा उलगडा करते, जिने ७०च्‍या दशकात देशाला हादरून टाकले. आशिष बेंडे यांचे दिग्‍दर्शन असलेल्‍या या सिरीजमध्‍ये प्रतिष्ठित कलाकारांसह आशुतोष गोवारीकर असून सिरीजमध्‍ये भारताचे शेरलॉक होम्‍स म्‍हणून ओळखले जाणारे प्रतिष्ठित सीआयडी डिटेक्टिव्‍ह ऑफिसर रमाकांत एस. कुलकर्णी यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Sep 20, 2024 | 12:19 PM
आशुतोष गोवारीकर दिसणार वेगळ्या भूमिकेत

आशुतोष गोवारीकर दिसणार वेगळ्या भूमिकेत

Follow Us
Close
Follow Us:

या रोमांचक सिरीजमध्‍ये गोवारीकर अद्वितीय भूमिका साकारणार आहेत, जे शांत व संयमी असण्‍यासोबत समजूतदार देखील आहे. ते साकारत असलेल्‍या भूमिकेमधून इतिहासातील सर्वात गुंतागुंतीच्‍या केसचा उलगडा करण्‍यासाठी आवश्‍यक असलेली अविरत कटिबद्धता, चिकाटी व कौशल्‍यांना पाहायला मिळेल. तसेच, या सिरीजमध्‍ये १९७०च्‍या दशकात ग्रामीण महाराष्‍ट्रातील गूढ हत्‍यांच्या मालिकेचा उलगडा करण्‍याचे त्‍यांचे प्रयत्‍न पाहायला मिळतील. या पाठलागादरम्‍यान ते काळाच्‍या विरोधात जातात.

काय म्हणाले आशुतोष?

रमाकांत एस. कुलकर्णीची भूमिका साकारण्‍याबात आशुतोष गोवारीकर म्‍हणाले, “आज मुंबई सीआयडीचे पोलिस अधिकारी रमाकांत एस. कुलकर्णी यांची भूमिका साकारण्‍याची संधी मिळाल्‍याने मी स्‍वत:ला भाग्‍यवान मानतो. त्‍यांनी अनेक केसेस सोडवल्‍या, ज्‍यांचा अन्‍यथा उलगडा झाला नसता. यामध्‍ये कुप्रसिद्ध मानवत मर्डर्सचा देखील समावेश आहे. 

ते भारताचे शेरलॉक होम्‍स म्‍हणून ओळखले जायचे. त्‍यांचे आत्‍मचरित्र ‘फूटप्रिंट्स ऑन द सँड ऑफ क्राइम’मध्‍ये या हत्‍याकांडामधील संपूर्ण प्रक्रिया, त्‍यांनी बारकाईने घेतलेला शोध, संशयित व्‍यक्‍तींसंदर्भात केलेली हाताळणी, त्‍यांना गुन्‍ह्याची कबूली देण्‍यास भाग पाडलेली स्थिती अशा अद्भुत बाबींची माहिती आहे, तसेच ‘सत्‍यापलीकडे सत्‍याचा शोध’ यावरील त्‍यांचा विश्‍वास देखील दिसून येतो.” आपल्‍या सह-कलाकारांबाबत सांगताना ते पुढे म्‍हणाले, “या सिरीजचा आणखी एक उत्‍साहवर्धक पैलू म्‍हणजे मी खूप वर्षांनंतर मकरंद अनासपुरेसोबत काम केले (१९९८ मध्‍ये चित्रपट ‘सरकारनामा’) आणि माझ्या दोन आवडत्‍या अभिनेत्री सोनाली कुलकर्णी व सई ताम्‍हणकर यांच्‍यासोबत काम करण्‍याची संधी मिळाली.  त्‍यांच्‍यासोबत काम करणे म्‍हणजे अभिनयाचे नवीन धडे मिळवण्‍यासारखे होते. मला दिग्‍दर्शक आशिष बेंडे यांच्‍यासोबत काम करण्‍याचा देखील आनंद झाला आहे, ज्‍यांना ही कथा, शैली आणि सर्वात महत्त्वाचे म्‍हणजे माझ्या भूमिकेबाबत सखोलपणे माहित होते.”

हेदेखील वाचा – Manvat Murders : दीड वर्ष अन् ७ खून; ‘मानवत मर्डर’ मध्ये केव्हाही न पाहिलेला मराठी कलाकारांचा अंदाज

रमाकांत कुलकर्णींच्या कुटुंबाची भेट

असा केला भूमिकेचा अभ्यास

रमाकांत एस. कुलकर्णी यांच्‍या कुटुंबाला भेटण्‍याबात ते पुढे म्‍हणाले, “मी रमाकांत कुलकर्णी यांच्‍या पत्‍नी, त्‍यांची मुलगी अनिता भोगले आणि अनिताजींचे पती हर्षा भोगलेजी यांना भेटलो. त्‍यांच्‍याकडून रमाकांत यांचा स्‍वभाव, व्‍यक्तिमत्त्‍व, वागणूक, विश्‍वास, वैयक्तिक जीवन अशा अनेक गोष्‍टींबाबत जाणून घेतले. या माहितीमुळे मला या भूमिकेसाठी माझ्या स्‍वत:च्‍या विनम्र पद्धतीने तयारी करण्‍यास मदत झाली. रमाकांतजींचा वारसा प्रेरणादायी व सखोल आहे आणि मी आशा करतो की, या सिरीजच्‍या माध्‍यमातून विविध केसेसचा उलगडा करण्‍याच्या त्‍यांच्‍या उल्‍लेखनीय कामाकरिता त्‍यांना मान्‍यता व सन्‍मान मिळेल, ज्‍यासाठी ते पात्र आहेत.” 

पाहा टीझर 

हेदेखील वाचा – Sai Tamhankar Exclusive : मॉडर्न सई कशी बनली ‘मानवत मर्डर’ मधील समिंद्री? वेगळ्या धाटणीच्या भूमिकेबाबत सईचा उत्साह

सोनी लिव्हवर पाहता येणार

स्‍टोरीटेलर्स नूक (महेश कोठारे व आदिनाथ कोठारे) निर्मित आणि गिरीश जोशी यांची निर्मिती असलेली सिरीज ‘मानवत मर्डर्स’चे दिग्‍दर्शक आशिष बेंडे आहेत. रमाकांत एस. कुलकर्णी यांची आत्‍मचरित्रात्‍मक कलाकृती ‘फूटप्रिंट्स ऑन द सँड ऑफ क्राइम’वर आधारित या सिरीजमध्‍ये आशुतोष गोवारिकर, मकरंद अनासपुरे, सोनाली कुलकर्णी आणि सई ताम्‍हणकर असे प्रतिभावान कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.

Web Title: Ashutosh gowariker plays famous detective ramakant kulkarni as lead role in manvat murders

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2024 | 12:19 PM

Topics:  

  • OTT platform

संबंधित बातम्या

Dish TV चा धमाका! स्मार्टफोनच्या किमतीत लाँच केला 4K स्मार्ट टीव्ही; आता DTH आणि OTT एकाच छताखाली
1

Dish TV चा धमाका! स्मार्टफोनच्या किमतीत लाँच केला 4K स्मार्ट टीव्ही; आता DTH आणि OTT एकाच छताखाली

OTT सबस्क्रिप्शनचा नवा नियम होणार लागू? प्लॅन कॅन्सल करणं होणार आणखी कठीण? नेमकं प्रकरण आहे तरी काय?
2

OTT सबस्क्रिप्शनचा नवा नियम होणार लागू? प्लॅन कॅन्सल करणं होणार आणखी कठीण? नेमकं प्रकरण आहे तरी काय?

संजय दत्त- मौनी रॉयचा ‘द भूतनी’ लवकरच ओटीटीवर रिलीज होणार, कधी आणि कुठे रिलीज होणार चित्रपट?
3

संजय दत्त- मौनी रॉयचा ‘द भूतनी’ लवकरच ओटीटीवर रिलीज होणार, कधी आणि कुठे रिलीज होणार चित्रपट?

अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर पावसाळ्यात आता थरार, रहस्य आणि डब मराठी चित्रपटांचा मेगा वर्षाव!
4

अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर पावसाळ्यात आता थरार, रहस्य आणि डब मराठी चित्रपटांचा मेगा वर्षाव!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.