हळद लागली नवरदेवा... गोवारीकरांच्या दारी सजलाय लग्नाचा मांडव, कोणार्क- नियतीच्या हळदीचे Photos Viral
चित्रपट निर्माते आशुतोष गोवारीकर यांचा मुलगा कोणार्क गोवारीकर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. चित्रपट निर्माते आशुतोष गोवारीकर यांच्या घरी लग्नाची लगबग सुरु झाली आहे. आशुतोष गोवारीकर आणि त्याची पत्नी सुनीता हे त्यांच्या मोठ्या मुलाच्या लग्नाच्या तयारीत व्यग्र आहेत. कोणार्क त्याची गर्लफ्रेंड नियती कनकियाबरोबर सात फेरे घेण्यासाठी सज्ज आहे. नियती ही प्रसिद्ध रिअल इस्टेट उद्योजक रासेश बाबूभाई कनकिया यांची मुलगी आहे. कोणार्क गोवारीकर हा लग्नबंधनात 2 मार्च 2025 रोजी अडकणार आहे. लग्नाची तयारी जोरात सुरू असताना या जोडप्याचा अलीकडेच त्यांच्या जवळच्या मित्रांसोबत आणि कुटुंबातील सदस्यांसोबत हळदी समारंभ आणि लग्नाच्या पूर्वीचे विधी पार पडले.
भारतात कधी अन् कुठे पाहता येणार ‘Oscars 2025’ सोहळा? जाणून घ्या एका क्लिकवर
कोणार्क आणि नियतीचा २८ फेब्रुवारी २०२५ रोजी हळदी समारंभ आयोजित करण्यात आला होता. कोणार्क- नियतीच्या हळदी समारंभातले काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, कोणार्क- नियतीच्या हळदीचे फोटो अभिनेत्री शजान पदमसीने इन्स्टा स्टोरी शेअर केली होती, ती सुद्धा आनंददायी समारंभाचा भाग झाली होती. तिने इन्स्टा स्टोरीजमध्ये काही क्षण शेअर केले आहेत जिथे कोणार्क आणि नियती बसून त्यांच्या पाहुण्यांनी सादर केलेल्या नृत्य सादरीकरणाचा आनंद घेत असल्याचे दिसून आले आहे. त्याच वेळी, होळीच्या सुरुवातीच्या सेलिब्रेशनसाठी सर्वांनी एकमेकांवर रंग उडवले.
कोणार्क क्लासिक पांढऱ्या कुर्ता-पायजमा सेटमध्ये कोणत्याही मेकअपशिवाय अभिनेता सुंदर दिसत होता. त्याने आपले केस व्यवस्थित स्टाईल केले आणि कार्यक्रमाचा आनंद घेत आपला लूक मिनिमलिस्ट ठेवला. तथापि, लवकरच होणारी वधू जटिल भरतकाम आणि काही मिरर वर्कसह पेस्टल गुलाबी लेहेंग्यात खूपच सुंदर दिसत होती जे उत्सवाच्या लूकसाठी आदर्श होते. तिने ते मॅचिंग ब्लाउज आणि एम्ब्रॉयडरी केलेल्या कडा असलेल्या शीअर दुपट्ट्यासह जोडले. नियतीने तिच्या आउटफिटला स्टेटमेंट चोकर नेकलेस आणि मॅचिंग इअररिंग्जने आपला मेकअप केला होता. शिवाय, तिने केलेल्या मेकअपचीही नेटकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा होती.
Namdeo Dhasal Movie: “सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी”, मल्लिका शेख यांची मागणी
कोणार्कचा विवाह सोहळ्यात बॉलिवूडमधील अनेक स्टार उपस्थित राहिल अशी अपेक्षा केली जात आहे. तसेच या लग्नात वधू आणि वर दोन्ही बाजूंचे जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित राहणार आहेत. अलिकडेच, आशुतोष गोवारीकर आणि त्यांची पत्नी सुनीता यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि त्यांना त्यांचा मुलगा कोणार्क आणि नियती कनकिया यांच्या लग्नाचे आमंत्रण दिले. त्यांनी हे आमंत्रण स्वीकारले, परंतु सध्या त्यांच्या उपस्थितीबद्दल कोणतीही पुष्टी नाही. पंतप्रधानांना लग्नाचे निमंत्रण देतानाचा फोटो आधीच व्हायरल झाला आहे. लग्नात कोणार्क- नियतीचे कुटुंबीय, नातेवाईक व मित्र-मैत्रिणी या लग्नात उपस्थित राहणार आहेत. तसेच मराठी आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींसह उद्योगविश्वातील नामांकित उद्योगपतींना या सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे.
कोकणच्या जावयाचं कोळी गीत रिलीज, ‘देवमाणूस’फेम किरण गायकवाडचं ‘दर्याचं पाणी’गाणं ऐकलंत का?
कोणार्क गोवारीकरविषयी बोलायचे झाल्यास तो त्याच्या वडिलांबरोबर फिल्ममेकिंगचे काम शिकतोय, शिवाय चित्रपट निर्मितीचेही तो बारकावे शिकत आहे. वडिलांप्रमाणेच चित्रपट उद्योगात काम करण्यास कोणार्क उत्सुक असल्याचे बोलले जात आहे. आशुतोष गोवारीकर यांच्या पत्नीचं नाव सुनीता गोवारीकर असं असून आशुतोष आणि सुनीता गोवारीकर यांना दोन मुलं आहेत. कोणार्क हा मोठा मुलगा असून लहान्या मुलाचे नाव विश्वांग गोवारीकर आहे. आशुतोष गोवारीकर बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शकांपैकी एक असून त्यांनी अनेक चित्रपटांची आणि काही वेबसीरीजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.