sunita ahuja u turn on she and govinda live separately
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ९० च्या दशकातील प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता अहुजा यांच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा सुरु आहे. कायमच आपल्या अभिनयाने, कॉमेडीने आणि दमदार डान्स शैलीने प्रेक्षकांना आपलंसं करणाऱ्या अभिनेत्याच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ आलंय. सुनिताने लग्नाच्या ३७ वर्षांनंतर गोविंदाला घटस्फोटाची नोटिस पाठवली असल्याचं म्हटलं गेलं. पण या सर्व अफवा असल्याचं सिद्ध झालं. गोविंदा-सुनिता वेगळे होणार नाहीत, यावर शिक्कामोर्तब झाला. कारण या सर्व चर्चांवर गोविंदाची पत्नी सुनिता अहूजाने पहिल्यांदाच आपलं मत व्यक्त केलं आहे.
Namdeo Dhasal Movie: “सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी”, मल्लिका शेख यांची मागणी
काही महिन्यांपूर्वी सुनीता अहुजाने दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं होतं की, ती आणि गोविंदा मात्र एकत्र राहत नाहीत. पण, त्यानंतर लगेचच सुनीता म्हणाली की दुसरे घर फक्त गोविंदाच्या राजकीय कामासाठी होते आणि ते वेगळे झालेले नाहीत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सध्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, त्या व्हायरल व्हिडिओमध्ये सुनिता माध्यमांना मुलाखती देताना दिसत आहे. त्यामध्ये अभिनेत्री म्हणते की, “आम्ही दोघे वेगवेगळे राहण्याचं कारण म्हणजे, गोविंदा राजकारणात सक्रीय आहे. जेव्हा गोविंदाला राजकारणात सहभागी व्हायचं होतं, तेव्हा घरी सतत कार्यकर्त्यांची रेलचेल असायची. त्या काळात आमची मुलगी तारुण्यात प्रवेश करत होती. तरुण मुलगी आणि मी घरी असायचो. मी आणि माझी मुलगी घरी दिवसभर शॉर्ट्स घालून फिरायचो, म्हणूनच आम्ही आमच्या अपार्टमेंटच्या समोरंच ऑफिस घेतले. मला गोविंदापासून कोणी वेगळं करु शकत नाही. आम्हाला वेगळं करणारा कोणी व्यक्ती असेल त्याने समोर यावं.”, असं सुनीता व्हिडीओत म्हणताना दिसते.
‘संत्र्यासारखा आंबट, लाल मिरची सारखा तिखट…’ Mithila Palkarचे रूप पाहता हृदयाची स्थिती झाली बिकट
दरम्यान, अभिनेत्याच्या पत्नीने घटस्फोटाच्या चर्चांवर परखड मत व्यक्त केल्यानंतर त्या चर्चांमध्ये काही तथ्य नव्हतं, हे स्पष्ट झालंय. गोविंदा आणि सुनिताने मार्च १९८७ साली लग्न केलं असून त्यांना टीना नावाची मुलगी आणि यशवर्धन नावाचा मुलगा आहे. गेल्या काही दिवसांपासून गोविंदा-सुनितामध्ये मतभेद होते, त्यामुळे दोघे घटस्फोटाचा निर्णय घेणार असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. पण सुनिताने दिलेल्या या स्टेटमेंटमुळे या चर्चांना आता पूर्णविराम मिळालाय. गोविंदाने २००४ मध्ये राजकारणात प्रवेश केला होता, पण त्याने २००८ मध्ये राजकारण सोडले. कारण तो संसदेत अनुपस्थित राहत होता. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी २०२४ मध्ये गोविंदाने शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला. त्याने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी पक्षाचा प्रचारही केला होता. अभिनेत्याने मार्च २०२४ मध्ये शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला होता.