सौजन्य- सोशलमिडिया
आज मुंबईमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे लग्न पार पडत आहेत .तब्बल दोन वर्ष चालेला अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा लग्नसोहळा आज संपन्न होत आहे. संध्याकाळपासूनच जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये देशातीलच नव्हे तर अख्या जगभरातून आलेल्या पाहुणे मंडळींची रेलचेल आहे.ही सेलिब्रिटी पाहूणे मंडळीही आपल्या विशेष डिझाईन क्लोथने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. प्रत्येकाने परिधान केलेले कपडे चर्चेचा विषय ठरत आहे.
भाईजान सलमान खानने पठाणी परिधान केली आहे. आणि त्याच्या डॅशिंग स्टाईलने लग्नमंडपात एण्ट्री केली आहे. त्याचा पठाणी परिधान केलेला हा लूक लोकांना आकर्षित प्रचंड आकर्षित करत आहे. त्याच्या सोबत त्याची बहीण अर्पितानेही लग्नात उपस्थिती लावली आहे.
बी टाऊनचे फेवरेट कपल किआरा अडवाणी आणि सिध्दार्थ हे लग्नासाठी उपस्थित आहेत. सिध्दार्थने शेरवानी परिधान केली असून किआराने ही सिध्दार्थच्या पोशाखाला मॅचिंग असा पोशाख केला आहे. किआराने परिधान केलेल्या अलंकारामुळे तीच्या सौदर्यांत भर पडली आहे.
शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांनीही एकमेकांना साजेसे कपडे परिधान केलेले आहेत. शाहिदने पाढऱ्या रंगाची शेरवानी परिधान केली असून मीरानेही त्याला साजेसा लाईट टोनमधील पोशाख परिधान केला आहे. तिच्या पोशाखावरील नक्षीकाम लक्ष वेधून घेत आहे.
विकी कौशल आणि कॅटरीना यांनीही चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. कॅटरीनाने लाल रंगाची उठावधार साडी परिधान केली आहे. तिने परिधान केलेल्या नेकलेसमुळे ती अजूनच आकर्षक दिसत आहे तर विकीने पाढऱ्या रंगाची शेरवानी परिधान केली आहे.
तेलगू सुपरस्टार रामचरणने त्याच्या पत्नीसह या लग्नसमारंभात हजेरी लावली. रामचरणने पाढरा शुभ्र असा कुर्ता पायजमा परिधान केला होता तर त्याच्या पत्नीने पिस्ता रंगाची साडी परिधान केली आहे.