मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या (Underworld Don Dawood Ibrahim) बॉलीवूडनंतर (Bollywood) आता टॉलिवूड (Tollywood) (तेलुगु सिनेमा) कनेक्शनचे दुवे समोर आल्याचा खळबळजनक खुलासा राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) तपासात झाला आहे. टॉलीवूडच्या वाढत्या वर्चस्वामुळे बॉलिवूडला काही काळ मागे सोडून केवळ डी-कंपनीच (D Company) टॉलीवूडमध्ये हात आजमावत नाहीये तर डी-कंपनीच्या घरातील स्टार्सही तिथल्या इंडस्ट्रीत सामील होत आहेत. टॉलिवूडचा व्यवसाय (Tollywood Business) जसजसा वाढत आहे आणि टॉलीवूडने बॉलीवूडला मागे टाकले आहे, तसतसे अंडरवर्ल्डनेही तेथे आपले पाय रोवायला सुरुवात केली आहे.
एनआयएच्या डी-कंपनीशी संबंधित ऑपरेशनच्या तपासादरम्यान नोंदवलेल्या स्टेटमेंटवरून एनआयएला समजले आहे की, छोटा शकीलच्या कुटुंबातील एक अभिनेत्री सध्या टॉलीवूडमध्ये नवीन ओळख घेऊन काम करत आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये छोटा शकीलच्या कुटुंबीयांनी त्याच्या बँक खात्यात लाखो रुपयांचा केलेला धक्कादायक व्यवहारही एनआयएच्या निदर्शनास आला आहे. कंपनीने टॉलीवूडमध्ये त्याच्या कनेक्शनद्वारे आणि आवडत्या अभिनेते आणि अभिनेत्रींद्वारे मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवले आहेत. छोटा शकीलने हा व्यवहार त्याच्या कुटुंबीयांच्या माध्यमातून केला आहे.
[read_also content=”अजब नियमाची गजब कथा : तुमच्यासाठी कायपण सौदी अरेबियात गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडला एकत्र राहण्याची मिळते शिक्षा! रोनाल्डोसाठी त्यांनी दिलीये स्वतःच्याच नियमांना तिलांजली https://www.navarashtra.com/world/rules-changes-saudi-arabia-strict-law-for-unmarried-couples-living-together-except-cristiano-ronaldo-nrvb-362203.html”]
अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा मेहुणा आसिफ शेख उर्फ भाईजानच्या दुसऱ्या पत्नीच्या मुलीने चेन्नईमधून टॉलिवूडमध्ये करिअरला सुरुवात केली आहे. भाईजान सध्या तुरुंगात आहे, त्याच्याबद्दल फारशी माहिती कोणालाच नव्हती. भाईजानच्या सावत्र मुलीला मुमताजच्या नावाने टॉलिवूडमध्ये ब्रेक मिळाला, तिने तिथेच आपले स्थान निर्माण केले आहे. टॉलिवूडमधील अनेक हिट सिनेमांमध्ये तिने प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून काम केले आहे.
[read_also content=”काय द्याचं असं आहे! बायकोशी बळजबरीने शारीरिक संबंध ठेवणाऱ्या कायद्याबाबत एवढं चर्वण का? जाणून घ्या ट्विटरवर तर्कांना का आलाय ऊत https://www.navarashtra.com/india/marital-rape-case-in-supreme-court-why-people-protesting-aggresively-on-twitter-wait-and-watch-nrvb-362174.html”]
आरिफ भाईजानच्या दुसऱ्या पत्नीने तपासादरम्यान एनआयएला सांगितले की २०२१ मध्ये त्याच्या कुटुंबाने गोरेगावमध्ये ३५ कोटी रुपयांना थ्री बीएचके फ्लॅट खरेदी केला होता. त्यासाठी त्यांनी गुंतवणूकदारांना ७० लाख रुपये दिले होते. फेब्रुवारी २०२१ मध्ये, संबंधित गुंतवणूकदारांनी २ डिमांड ड्राफ्टद्वारे ७० लाख रुपये परत केले आणि फ्लॅट मिळवला, त्यानंतर, आरिफच्या सांगण्यावरून, छोटा शकीलची मुलगी झारा हिच्या पतीने तिच्या खात्यात ५ लाख रुपये जमा केले. हे पैसे झाराने टॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या आपल्या मुलीच्या खात्यात ६ आणि ४ लाखांच्या रूपात जमा केले होते.
मल्याळम, तेलगू, तामिळ, कन्नड या दक्षिणेकडील भाषांमधील चित्रपटांचे शहर टॉलीवूड म्हणून ओळखले जाते. त्याची उलाढाल अब्जावधींमध्ये आहे, या भाषांमधील हिंदीत डब केलेले चित्रपट बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई करत आहेत. त्यामुळे आता अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमने आपले लक्ष टॉलिवूडकडे वळवल्याचे समोर आले आहे. डी गँगने टॉलीवूडमध्येही आपला तळ बनवल्याचा सुगावा एनआयएला मिळताच त्यांनी तपास सुरू केला आणि त्यांना कळले की टॉलीवूडमधील अनेक बडे कलाकार मनी लाँड्रिंगमध्ये तसेच डी गँगमध्ये सामील आहेत.