'भाऊच्या धक्क्या'वर रितेश देशमुख घेणार आर्याची शाळा
Rapper Aarya Jadhav : ‘बिग बॉस मराठी’चा सीझन ५ सुरू होऊन महिना झालाय आणि महिनाभरातच सर्व समीकरणं बदलली आहे. ह्या पाचव्या आठवड्यात अरबाज पटेलसह संपूर्ण घर उभं राहिलं होतं आणि संपूर्ण घराने निक्की तांबोळी आणि अभिजित सावंत यांना टारगेट केलेलं दिसून आलं. आज ‘भाऊच्या धक्क्या’वर रितेश देशमुखने घरातील सर्व सदस्यांची चांगलीच शाळा घेताना दिसत आहे. दरम्यान, रॅपर आर्याचीदेखील कानउघडणी करताना रितेश दिसत आहे. “मला सांगू नका तुम्ही कसे दिसताय”, असं म्हणत रितेशने आर्याची कानउघडणी केली.
कलर्स मराठीच्या इन्स्टाग्राम हँडलवर आजच्या एपिसोडचे शेअर करण्यात आले आहे. प्रोमोमध्ये, ‘भाऊच्या धक्क्या’वर रितेश देशमुखने सर्वच स्पर्धकांची चांगलीच शाळा घेतली आहे. अरबाज पटेल आणि नंतर रॅपर आर्याची सुद्धा रितेश देशमुखने कानउघडणी केली आहे. “निक्कीशिवाय तुझा गेम नाही”, असं म्हणत रितेश भाऊ आर्याची जोरदार शाळा घेताना दिसणार आहे. त्यावर आर्या म्हणते, “निक्की प्रोब्लेम क्रिएट करते. आम्ही त्यावर रिॲक्शन देतो.” दरम्यान आर्याला थांबवत रितेश म्हणतो, “आम्ही नाही… तुम्ही स्वत:बद्दल बोला.” त्यावर आर्या म्हणते, “निक्की माझा गेम नाही आहे.”
आर्याच्या विधानावर रितेश म्हणतो,”तुम्हाला असं वाटतं तुमचा गेम नाही आहे… आता तुम्ही जे दिसताय ते फक्त निक्कीच्या रिॲक्शनवर दिसताय. मला इथे सांगू नका तुम्ही कसे दिसताय”. पाचव्या आठवड्यामध्ये संपूर्ण घर निक्की आणि अभिजितच्या विरोधात बोलताना दिसत आहे. निक्कीच्या विरोधात टीम A मधील सर्वच स्पर्धक बोलताना दिसत आहे. भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख सदस्यांना एक वेगळा रिॲलिटी चेक देताना दिसणार आहे. बिग बॉस मराठी हा ग्रुप गेम नाही. त्यामुळे दुसऱ्याचं चांगलं करण्यासाठी स्वत: वाईट होऊ नका, असा सल्ला रितेश भाऊ सदस्यांना देताना दिसणार आहे.
हे देखील वाचा – अरबाजला रितेश देशमुखचा दणका, उघडणार का घरच्यांचे डोळे