Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

छोट्या पडद्यावर रितेश भाऊचं राज्य! कलर्स मराठीच्या ‘बिग बॉस मराठी’ने रचला नवा विक्रम

कलर्स मराठी' वाहिनीवर 'बिग बॉस मराठी'चा पाचवा सीझन नव्या ढंगात, नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि या सीझनने अल्पावधीतच रेकॉर्ड ब्रेक करायला सुरुवात केली आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Aug 22, 2024 | 09:42 PM
कलर्स मराठीच्या 'बिग बॉस मराठी'ने रचला नवा विक्रम

कलर्स मराठीच्या 'बिग बॉस मराठी'ने रचला नवा विक्रम

Follow Us
Close
Follow Us:

कलर्स मराठी’ वाहिनीवर ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन नव्या ढंगात, नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि या सीझनने अल्पावधीतच रेकॉर्ड ब्रेक करायला सुरुवात केली आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनचा मंच रितेश भाऊने दणाणून सोडला आहे. नव्या सीझनमधील रितेश भाऊची लयभारी स्टाईल, नाविन्य, तरुणपण, कल्ला या सर्वच गोष्टी सीझनचा विक्रम रचण्यात कारणीभूत ठरत आहेत. ग्रँड प्रीमियरपासून सुरू झालेली ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनची क्रेझ दिवसेंदिवस वाढतच आहे.

लहान मुलं, महिलावर्ग ते आबाल वृद्ध अशा सर्वांनाच ‘बिग बॉस मराठी’ने वेड लावलं आहे. ‘बिग बॉस मराठी’ची आणि रितेश भाऊच्या कमाल होस्टिंगची चाहत्यांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. रितेश देशमुखच्या बिग बॉसच्या घरातील विकेंडला होणाऱ्या ‘भाऊच्या धक्क्या’ने पुन्हा टीआरपीच्या यादीत सर्वच मालिकांचे टीआरपी रेटिंग्ज मोडीत काढले.

‘बिग बॉस मराठी’ या लोकप्रिय रिअॅलिटी शोच्या शनिवारच्या भाऊच्या धक्क्याला 3.7 रेटिंग मिळाले असून रविवारच्या अक्षय कुमार स्पेशल भाऊच्या धक्क्याला 4.0 रेटिंग मिळाले आहे. एकंदरीतच ‘भाऊच्या धक्क्याला’ 3.9 एव्हरेज रेटिंग मिळाले आहे. ‘बिग बॉस मराठी’ने संपूर्ण आठवडा गाजवला आहे. खरंतर ‘बिग बॉस मराठी’ने स्वत:चाच रेकॉर्ड ब्रेक केला आहे. इतर मराठी वाहिन्यांवरील कथाबाह्य कार्यक्रमांना मागे टाकत ‘बिग बॉस मराठी’ने इतिहास रचला आहे.

‘बिग बॉस मराठी’चं बिगुल वाजलं आणि नव्या पर्वाची दिमाखात सुरुवात झाली. महाराष्ट्रातील घराघरांत रात्री 9 च्या ठोक्याला ‘बिग बॉस मराठी’चा नवा सीझन पाहिला जातो. कॉलेजच्या कट्ट्यापासून ते कार्पोरेट ऑफिसपर्यंत सर्वत्र ‘बिग बॉस मराठी’बद्दल चर्चा होताना दिसून येते. ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनसोबत नवी पिढी जोडली जात आहे.

Web Title: Bigg boss marathi 5 trp records ritiesh deshmukh bhaucha dhakka trp ratings tops in non fiction show

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2024 | 09:27 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.