"आर्या अभिनंदन तमाम महाराष्ट्राची...", आर्याने निक्कीच्या कानफाडीत लगावल्यानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस
बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन सुरू होऊन आता जवळपास ४५ दिवस झाले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून बिग बॉसच्या घरात स्पर्धकांची चांगलीच हमरी तुमरी रंगताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी निक्की ‘टीम ए’ मधून बाहेर पडल्यानंतर घरात दोन गट पडले आहेत. सध्या बिग बॉसच्या घरात कॅप्टन्सीमुळे आणि नॉमिनेशन टास्कमुळे कमालीचा वाद सुरू आहे. कालच्या एपिसोडमध्ये (१२ सप्टेंबर) आर्या जाधवने निक्की तांबोळीच्या कानाखाली मारल्यामुळे तिला आज बिग बॉस शिक्षा सुनावणार आहे. नेमकी आर्याला बिग बॉस काय शिक्षा सुनावणार ? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
हे देखील वाचा – माणूस आणि भुताच्या नात्याची रंगतदार गोष्ट “एक डाव भुताचा” चित्रपटाचे टीजर झाले लाँच!
यंदाचा बिग बॉस मराठीचा सीझन वाद, मारामारी आणि भांडणामुळे कमालीचा चर्चेत राहिला आहे. अगदी पहिल्या दिवसापासून ते आजपर्यंत या अनेक गोष्टींमुळे हा सीझन चर्चेचा विषय ठरला आहे. पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात भांडण झाले. कालच्या एपिसोडमध्ये निक्की आणि आर्यामध्ये वाद झाला. या वादाचे रुपांतर पुढे मारामारीमध्ये झाले. आर्याने कालच्या एपिसोडमध्ये निक्कीच्या कानाखाली दिली. त्यामुळे एकंदरितच घरातलं वातावरण चांगलंच तापलेलं दिसलं. आर्याने निक्कीच्या कानाखाली दिल्यामुळे बिग बॉस तिला शिक्षा सुनावणार आहेत. सध्या अनेक चाहते आणि अनेक मराठी सेलिब्रिटी आर्याच्याच बाजुने आहेत.
यापूर्वीही अनेकदा निक्की आणि अरबाजने घरातल्या स्पर्धकांना चुकीची वागणूक दिलेली आहे. त्यामुळे निक्की आणि अरबाजला जर शिक्षा नाही तर, आर्यालाच शिक्षा का ? अशी सध्या चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे. सध्या सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून आर्याला पुर्णपणे सपोर्ट मिळत आहे. आर्याचे चाहत्यांकडून जोरदार कौतुक केले जात असून निक्की आणि अरबाजला तुफान ट्रोल केले जात आहे. अनेक नेटकऱ्यांनी तर निक्कीला एकच कानाखाली न मारता आणखी तिच्या कानशिलात मारायला हवी… अशाही प्रतिक्रिया देत आहेत.
“आमच्याकडून आर्याला जाहीर पाठिंबा…”, “आर्या तू भिड आमचा तुला पुर्णपणे पाठिंबा आहे.”, “आर्या अभिनंदन तमाम महाराष्ट्राची इच्छा पूर्ण केलीस!”, “अरबाजने जान्हवीचा आणि पंढरीचा हात पिरगळला. तसेच अभिजीतला पण जोरात धक्का दिला. त्याला पण शिक्षा झाली पाहिजे.”, “आर्या ची चूक आहे तिने एकच चापट मारली ,तिने तिला बेदम मारायला हव होतं”, “जान्हवीने काय खेळ केलाय यार.. एका बुक्कीत टेंगुळ, अरबाजचं तर तोंड बघण्यासारखं झालं होतं…”, “आर्याला शिक्षा होणार असेल तर अरबाजला पण झाली पाहिजे”, “तेव्ही कुठे होतात बिग बॉस तुम्ही जेव्हा निक्कीने आर्याला तिच्या हिल्स सहीत लाथ मारली होती”, “बाईईई… लई मज्जा आली राव आर्या…” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी करत आर्याला जाहीर पाठिंबा दिला आहे.