आई झाल्यानंतर दीपिका पादुकोण अभिनय सोडणार ? खास लेकीसाठी घेतला महत्वपूर्ण निर्णय
अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंह गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच ८ सप्टेंबरला आई- बाबा झाले आहेत. दीपिका आणि रणवीरला मुलगी झाली आहे. तेव्हापासून अभिनेत्री आणि बाळ दोघेही अद्याप हॉस्पिटलमध्येच आहेत. दीपिकाला आणि तिच्या बाळाला भेटण्यासाठी प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी, बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरूख खान सुद्धा हॉस्पिटलमध्ये पोहोचला होता. अशातच सध्या सोशल मीडियावर चर्चा होतेय, ती पालकत्वाची. हॉस्पिटलमधून बाहेर आल्यानंतर दीपिका इंडस्ट्रीला रामराम करत आलिया आणि ऐश्वर्याच्या पालकत्वाची स्टाईल निवडण्याची शक्यता आहे.
अद्याप रणबीर आणि दीपिकाने चाहत्यांना त्यांच्या मुलीचा फोटोही दाखवला नाही. तोच सध्या सोशल मीडियावर तिच्या पालकत्वाचीही चर्चा होत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, दीपिका भविष्यात मुलीचे संगोपन करण्यासाठ आलिया आणि ऐश्वर्याच्या पालकत्वाची स्टाईल वापरण्याची शक्यता आहे. अभिनेत्री त्या दोघींच्याही पालकत्वाच्या शैलीवर प्रभावित झाल्याचे बोलले जात आहे. ऐश्वर्याने तिची लेक आराध्या हिचे संगोपन आणि पालनपोषण करण्यासाठी तिने स्वत: इंडस्ट्रीतून ब्रेक घेतला होता. ऐश्वर्याने नॅनीची मदत न घेता स्वत: आराध्याचे पालनपोषण केले होते. ऐश्वर्याप्रमाणेच आता दीपिकाही करणार का ? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
२०१८ मध्ये, करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’शोमध्ये दीपिकाने उपस्थिती लावली होती. यावेळी करणने दीपिकाला “फिल्म की बेबी या दोघांमध्ये सर्वात आधी तू कोणाला प्राधान्य देशील ?” असा प्रश्न विचारला होता. यावर तिने, चित्रपट करता करता बाळाला जन्म देईल आणि त्याच्याकडे लक्ष देईल, असं उत्तर दिलं होतं. त्याप्रमाणेच ती करताना दिसत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, दीपिकाने बाळाला जन्म दिल्यानंतर ५ महिन्यांचा ब्रेक घेणार घेण्याची शक्यता आहे. त्यानंतरच पुढे अभिनेत्री आपल्या अपकमिंग चित्रपटांकडे लक्ष देईल.
दीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, दीपिका शेवटची ‘कल्की २८९८ एडी’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. तर रणवीर ‘रॉकी और रानी की प्रेम कहाणी’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तर आता लवकरच अभिनेता ‘डॉन ३’ आणि ‘सिंघम अगेन’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, दीपिका पदुकोणने २०१८ मध्ये रणवीर सिंगसोबत लग्न केले होते. ‘गोलियों की रासलीला: रामलीला’ या चित्रपटाच्या सेटवर या दोघांची भेट झाली होती. त्याचवेळी ते एकमेकांच्या प्रेमात पडले. ५ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न केले. या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. ‘गोलियों की रासलीला: रामलीला’, ‘पद्मावत’, ‘बाजीराव मस्तानी’, ’83’ या चित्रपटामध्ये एकत्र काम केले. त्यांचे हे चित्रपट सुपरहिट देखील ठरले.