२००० कोटींच्या ड्रग्ज तस्करी प्रकरणावर ममता कुलकर्णीचं महत्वाचं विधान, काय म्हणाली अभिनेत्री ?
शाहरुख खान आणि सलमान खानच्या ‘करण अर्जुन’ चित्रपटातील अभिनेत्री ममता कुलकर्णी २५ वर्षांनंतर भारतात परतली आहे. तिने मुलाखत देत ती भारतात का आलीये याचं कारण सांगितलं आहे. २००० कोटींच्या ड्रग्ज तस्करी प्रकरणात ती अडकली असताना तिच्यावर एका आंतरराष्ट्रीय ड्रग्ज ग्रुपसोबत तिचं कनेक्शन असल्याचं तिने सांगितलं होतं. ‘न्यूज १८’ला दिलेल्या मुलाखतीत तिने तिच्यावर असलेल्या आरोपांवर भाष्य केले आहे.
मल्याळम अभिनेत्री प्रज्ञा नागराचा खाजगी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल!
मुलाखतीत अभिनेत्री ममता कुलकर्णी म्हणाली, “विकी गोस्वामीच्या चुकीच्या कृत्यांशी माझा कोणताही संबंध नाही. मी विकीला २०१५ मध्ये भेटायला केनियाला गेले होती, पण त्याच्या कामाबद्दल मला काहीच माहिती नव्हती. मी जेव्हा त्याला भेटायला गेले, त्या दरम्यान तो कोणाकोणाला भेटला, याबद्दल मला काहीच माहिती नाही. पोलिसांनी माझंही नाव ड्रग्ज प्रकरणात टाकलं, पण माझा त्याच्या बिझनेसशी काहीही संबंध नाही. आता न्यायालयानेही मला निर्दोष घोषित केले आहे.”
रॅपर हनी सिंगवर बनली डॉक्युमेंटरी फिल्म, सिनेमात नाही तर ओटीटीवर होणार प्रदर्शित!
२०१५ मध्ये ममताचंही नाव ड्रग्ज तस्करी प्रकरणात आले होते, ज्यामुळे ती चर्चेत आली होती. २००० कोटी रुपयांच्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटमध्ये ममता सहभागी असल्याचा आरोप ठाणे पोलिसांनी तिच्यावर केला होता. तिच्यावर गँगस्टरला इफेड्रिनचा पुरवठा केल्याचा आरोप होता, ज्याचा वापर मेथॅम्फेटामाइन बनवण्यासाठी आणि तस्करी करण्यासाठी केला जात होता. जानेवारी २०१६ मध्ये ममता आणि तिचा सहकारी विकी गोस्वामी आणि इतर आरोपी केनियामध्ये ड्रग माफियांसोबतच्या मीटिंगमध्येही सहभागी झाल्याचे सांगण्यात येते. मात्र, नंतर मुंबई उच्च न्यायालयाने तिच्यावर पुराव्यांअभावी एफआयआर रद्द करून तिला निर्दोष घोषित केले.
‘मी नथुराम गोडसे बोलतोय…’ नाटकाचं हिंदीमध्ये विशेष प्रयोग, केव्हा आणि कुठे होणार प्रयोग ?
ममता कुलकर्णीच्या करियरबद्दल बोलायचे तर, तिने १९९२ मध्ये ‘तिरंगा’ चित्रपटातून फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला. तिच्या १० वर्षांच्या कारकिर्दीत तिने हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड, बंगाली आणि मल्याळम भाषांमधील एकूण ३४ चित्रपटांमध्ये काम केले. २००२ मधला ‘कभी तुम कभी हम’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. यानंतर ती इंडस्ट्रीमध्ये कुठेही सक्रिय दिसली नाही. ममताने ‘राम लखन’, ‘वक्त हमारा है’, ‘क्रांतीवीर’, ‘करण अर्जुन’, ‘सबसे बडा खिलाडी’, ‘आंदोलन’ आणि ‘बाजी’ यांसारख्या हिट आणि बहुचर्चित चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.