Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वादग्रस्त टिप्पणीनंतर अपूर्वा मखीजाला जबरदस्त धक्का, IIFA च्या Ambassador च्या यादीतून नाव वगळले

रणवीर अलाहाबादिया आणि समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' शोमुळे अपूर्वा मखीजा जबरदस्त वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. रणवीरच्या वादग्रस्त टिप्पणीनंतर आता अपूर्वाचे नाव आता आयफा पुरस्कारांच्या यादीतून काढून टाकण्यात आले.

  • By चेतन बोडके
Updated On: Feb 16, 2025 | 04:32 PM
वादग्रस्त टिप्पणीनंतर अपूर्वा मखीजाला जबरदस्त धक्का, IIFA च्या Ambassador च्या यादीतून नाव वगळले

वादग्रस्त टिप्पणीनंतर अपूर्वा मखीजाला जबरदस्त धक्का, IIFA च्या Ambassador च्या यादीतून नाव वगळले

Follow Us
Close
Follow Us:

कॉंटेंट क्रिएटर अपूर्व मखीजा, रणवीर अलाहाबादिया आणि समय रैना सध्या कमालीचे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. हे वादात सापडण्याचे कारण ठरलाय,  ‘इंडियाज गॉट लेटेंट’ शो. या शोमुळे ते जबरदस्त वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. शोमध्ये अपूर्वाने केलेल्या वादग्रस्त टिप्पणीनंतर तिला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, सोबतच तिला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

खरंतर, अपूर्वाला सोशल मीडियावर ‘द रिबेल किड’ तिच्या ह्या युजरनेमने चाहते ओळखतात. अपूर्वा ही इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी अवॉर्ड्स (आयफा)ची ब्रँड ॲम्बेसेडर होती, परंतु तिने ‘इंडियाज गॉट लेटेंट’ शोमध्ये केलेल्या वादग्रस्त टिप्पणीनंतर तिला ॲम्बेसेडर पदावरुन काढून टाकण्यात आलं आहे. पुढच्या महिन्यात राजस्थानच्या जयपूरमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी पुरस्कार सोहळ्याच्या अधिकृत राजदूतांच्या यादीतून तिला काढून टाकण्यात आले आहे.

‘छावा’ पाहण्यासाठी विकेंडला प्रेक्षकांची थिएटरमध्ये गर्दी; सलग दुसऱ्या दिवशीही रेकॉर्डब्रेक कमाई

हा निर्णय, कॉमेडियन समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या यूट्यूब शोच्या एका भागात रणवीर अलाहाबादिया आणि अपूर्वा मखीजाच्या वादग्रस्त टिप्पणीनंतर घेण्यात आला आहे. या भागात यूट्यूबर रणवीर अलाहाबादियाने पालकांबद्दल वादग्रस्त टिप्पणी केली होती. अपूर्व मखीजाला आयफा आणि राजस्थान टुरिझमसाठी एक व्हिडिओही शूट करावी लागणार होती. पण आता अपूर्वाचे नाव आयफा ॲम्बेसेडर यादीतून काढून टाकण्यात आले आहे. “आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी पुरस्कार सोहळ्याच्या (आयफा) यादीतून सोशल मीडियावर प्रसिद्ध असणाऱ्या अपूर्वा मखीजाचे नाव ॲम्बेसेडरच्या यादीतून काढून टाकण्यात आले आहे. ती आता अधिकृतपणे आयफाच्या ॲम्बेसेडरच्या यादीचा भाग नाही.” असं राजस्थानच्या पर्यटन मंत्री आणि उपमुख्यमंत्री दिया कुमारी यांच्या कार्यालयाने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटलं आहे.

 

पीटीआय या वृतसंस्थेच्या रिपोर्टनुसार, करणी सेनेने म्हटले आहे की, अश्लीलतेला प्रोत्साहन देणाऱ्या कोणालाही केवळ विरोधाला सामोरे जावे लागणार नाही तर त्यांना शारीरिकदृष्ट्याही सामोरे जावे लागेल असे उदयपूरमधील राजपूत करणी सेनेचे विभाग प्रमुख डॉ. परमवीर सिंग दुलावत यांनी सांगितले आहे. करणी सेनेने दिलेल्या धमक्यांनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. अपूर्वाला या महिन्याच्या अखेरीस उदयपूरमध्ये होणाऱ्या आयफा शोसाठी शूटिंग करायचे होते. करणी सेनेने शुटिंगला विरोध करत अपूर्वाला ॲम्बेसेडरच्या यादीतून काढून टाकण्यात यावे, अशी मागणी केली होती.

दिल्लीत युट्युबर Lakshay Chaudhary च्या गाडीवर हल्ला! सोशल मीडियावर शेअर केला व्हिडीओ

राजस्थान पर्यटन मंत्रालयाच्या देखरेखीखाली आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी पुरस्कार सोहळ्याचे आयोजन 8 आणि 9 मार्च रोजी जयपूर येथे होणार आहे. यापूर्वी अपूर्वाला या कार्यक्रमासाठी ॲम्बेसेडर म्हणून नियुक्त करण्यात आले होते. मात्र, आता तिचे नाव या यादीतून काढून टाकण्यात आले आहे.

Web Title: Bollywood indias got latent controversy the rebel kid apoorva makhija removed from iifa ambassador list amid ranveer allahbadia samay raina controversies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2025 | 04:32 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.