"अमेय पटनायक इज बॅक..." नवीन 'रेड' कोणावर पडणार ? Raid 2 रिलीज डेट जाहीर
अभिनेता अजय देवगणकडे सध्या सिक्वेल चित्रपटांची यादीच पडली आहे. अजय देवगण शेवटचा रोहित शेट्टीच्या ‘सिंघम अगेन’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता त्यानंतर अभिनेत्याचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘रेड २’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही महिन्यांपूर्वीच चित्रपटाची निर्मात्यांनी घोषणा केली होती. चित्रपट २०२४ मध्ये म्हणजेच यावर्षी रिलीज होणार होता. मात्र, निर्मात्यांनी विविध कारणांमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली. पण आता खुद्द अजय देवगणने त्याच्या बहुचर्चित ‘रेड २’ चित्रपटाची (Raid 2 Release Date) रिलीज डेट जाहीर केली आहे.
‘पुष्पा 2’ मधील खलनायक फहाद फासिलचे बॉलीवूडमध्ये पदार्पण, ‘या’ अभिनेत्रीसह करणार रोमान्स!
अजय देवगणने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर ‘रेड २’चे ऑफिशियल पोस्टर शेअर करत घोषणा केली आहे. पोस्टर शेअर करताना अभिनेत्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “IRS अमेय पटनायकचे पुढील मिशन मे 2025 पासून सुरू होत आहे! ‘रेड २’ १ मे २०२५ रोजी रिलीज होणार आहे.” चित्रपटाविषयी सांगायचे तर, ‘रेड २’ चित्रपट हा २०१८ मध्ये रिलीज झालेल्या ‘रेड’ चित्रपटाचा सिक्वेल आहे. त्यावेळी हा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडला होता. तेव्हापासून चाहते या चित्रपटाच्या सीक्वेलची प्रतीक्षा करत होते. ‘रेड २’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी अजय देवगन पुन्हा सज्ज झाला आहे.
पॅनोरमा स्टुडिओच्या बॅनरखाली ‘रेड २’ चे दिग्दर्शन राज कुमार गुप्ता यांनी केले आहे. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार, कुमार मंगत पाठक आणि अभिषेक पाठक यांनी केली आहे. चित्रपटामध्ये अजय देवगणने आयकर विभागातील IRS अमेय पटनायक या अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे.या चित्रपटात वाणी कपूर आणि रितेश देशमुखही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर, चित्रपटात रितेश देशमुख खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे रितेशला खलनायकाच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
अनुराग कश्यपसमोर शिल्पा शिरोडकर का झाली भावुक? विवियनलाही झाले दुःख!
मीडिया रिपोर्टनुसार, १९८० साली सरदार इंजर सिंग या व्यावसायिकाच्या घरी करण्यात आलेल्या छापेमारीवर आधारित चित्रपटाचं कथानक आहे. ते कथानक आता प्रेक्षकांना ‘रेड २’ चित्रपटाच्या माध्यमातून छापेमारीचा थरार पुन्हा एकदा पाहता येईल. अजय देवगण नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘सिंघम अगेन’ चित्रपटात शेवटचा दिसला होता. चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर संमिश्र प्रतिसाद मिळाला. आता लवकरच अजय देवगण ‘आझाद’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचा पुतण्या अमन देवगण ‘आझाद’ या बॉलिवूड चित्रपटातून फिल्म इंडस्ट्रीमध्ये डेब्यू करणार आहे. हा चित्रपट १७ जानेवारी २०२५ ला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर कंगना रणौतचा ‘इमरजन्सी’ चित्रपटही रिलीज होणार आहे. सहाजिकच या दोघांमध्ये क्लॅशेस पाहायला मिळणार. याशिवाय अजय देवगणचे ‘गोलमाल ५’, ‘शैतान २’, ‘दे दे प्यार दे २’ आणि ‘सन ऑफ द सरदार २’ सारखे चित्रपट पाइपलाइनमध्ये आहेत.