
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती पुन्हा एकदा बिघडली आहे. यावेळी त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. त्यांना अलिकडेच मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वृत्तानुसार, सुरुवातीला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु त्यांच्या प्रकृतीमुळे आता त्यांना व्हेंटिलेटर ठेवण्यात आले आहे.
धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत अद्याप सुधारणा झालेली नाही. अहवालांनुसार त्यांची प्रकृती अजूनही गंभीर आहे आणि श्वासाच्या त्रासामुळे त्यांना व्हेंटिलेटर शिफ्ट करण्यात आले आहे. डॉक्टरांची एक टीम रुग्णालयात त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. त्यांच्या प्रकृतीबद्दल कोणतेही अधिकृत माहिती आजून आली नाहीये. परिणामी, सोशल मीडियावर लोक त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.
89 वर्षीय धर्मेंद्र सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. सुरुवातीला ही फक्त नियमित वैद्यकीय तपासणी असून, काळजी करण्यासारखे काहीही कारण नसल्याची माहिती मिळत होती. आज सकाळी धर्मेंद्र यांची तब्येत बिघडल्याने ICU तून व्हेंटिलेटरवर शिफ्ट केल्याची माहिती समोर येत असल्यानं चाहत्यांची काळजी वाढलीय.
धर्मेंद्र गेल्या साडेसहा दशकांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. त्यांच्या दीर्घ कारकिर्दीत त्यांनी अनेक उत्कृष्ट चित्रपट दिले आहेत. गेल्या काही काळापासून ते त्यांच्या आगामी “इक्कीस” चित्रपटामुळे चर्चेत आहेत.
श्रीराम राघवन दिग्दर्शित या चित्रपटात धर्मेंद्र अमिताभ बच्चन यांचे नातू अगस्त्य नंदा यांच्यासोबत आहेत. अगस्त्य अरुण खेत्रपालची भूमिका साकारणार आहे, ज्यांना १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात त्यांच्या शौर्यासाठी मरणोत्तर परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आले होते.
अभिषेक बच्चनवर कोसळला दु: खाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचे निधन; म्हणाला, ”त्यांचा आशीर्वाद..”
हा चित्रपट २५ डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. मॅडॉक फिल्म्सच्या बॅनरखाली निर्मित, दिनेश विजन आणि बिन्नी पद्डा यांनी सह-निर्मिती केलेल्या या चित्रपटाची ही मालिका आहे. अगस्त्यचा हा चित्रपट रुपेरी पडद्यावर पदार्पण आहे. तो यापूर्वी २०२३ मध्ये आलेल्या “आर्चिज” या चित्रपटात दिसला होता. तो चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. “इक्कीस” हा त्याचा पहिला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.