(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
कॉमेडी-ड्रामा चित्रपट असलेल्या ‘तुम्हारी सुलू’चा आज सातवा वर्धापनदिन साजरा करत आहे. हा चित्रपट केवळ मनोरंजनच नाही तर सक्षमीकरणाचा संदेशही देतो. या चित्रपटात विद्या बालनने सुलोचना दुबे या गृहिणीची हृदयस्पर्शी व्यक्तिरेखा साकारली होती, जी रेडिओ जॉकी म्हणून काम करताना स्वत:ची एक नवीन बाजू शोधते. या चित्रपटात एका सामान्य स्त्रीचा प्रवास आहे जो तिची स्वप्ने आणि इच्छा पुन्हा जिवंत करण्याचे धाडस चित्रपटामध्ये दाखवण्यात आले आहे. चाहत्यांना अभिनेत्रीचे पात्र आणि अभिनय खूप आवडला होता. तसेच या चित्रपटाला चित्रपटगृहात चांगला प्रतिसाद देखील मिळाला होता.
विद्या बालनच्या अभिनयाने सुलोचना यांची व्यक्तिरेखा जिवंत झाली. तिने पात्रातील बारकावे सुंदरपणे टिपले, सुलोचना प्रत्येकासाठी एक संबंधित पात्र बनली. ‘तुम्हारी सुलू’ने विद्याचे अष्टपैलुत्व दाखवले कारण तिने विनोदी आणि नाटक दोन्ही समान स्वभावाने हाताळले. आणि चाहत्यांना हे खूप भावले. हा चित्रपट विनोदी, नाटक आणि उत्तम संगीताचा मिलाफ आहे आणि हा विद्या बालनच्या कारकिर्दीतील सर्वात लोकप्रिय चित्रपट मानला जातो. तसेच या चित्रपटातील गाणी देखील प्रेक्षकांना खूप आवडली. आणि या गाण्याला चांगला प्रतिसाद प्राप्त झाला.
तुम्हारी सुलू हा सुरेश त्रिवेणी लिखित आणि दिग्दर्शित मधील कॉमेडी-ड्रामा चित्रपट आहे. हा चित्रपट २०२१७ मध्ये प्रदर्शित झाला आणि आज या चित्रपटाला ७ वर्ष पूर्ण झाली आहेत. टी-सीरीजच्या बॅनरखाली भूषण कुमार, तनुज गर्ग, कृष्ण कुमार, अतुल कसबेकर आणि शांती शिवराम मैनी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तुम्हारी सुलू मध्ये विद्या बालन सुलू नावाची व्यक्तिरेखा साकारली होती. या चित्रपटाची कथा एक महत्वाकांक्षी गृहिणीवर आधारित आहे. तसेच या चित्रपटाने चित्रपगृहात २०० कोटींच्या बजेटमध्ये ५१३ दशलक्ष पेक्षा जास्त कमावले आणि बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळवले आहे.
अभिनेत्री विद्या बालनसंबंधित बातमी वाचण्यासाठी इथे क्लीक करा.
दरम्यान, आता ‘भूल भुलैया 3’ मध्ये विद्या बालन पुन्हा एकदा मंजुलिकाच्या भूमिकेत परतली आहे. तसेच या चित्रपटाद्वारे अभिनेत्री धुमाकूळ घालताना दिसत आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन, माधुरी दीक्षित आणि तृप्ती डिमरी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. अनीस बज्मी दिग्दर्शित हा चित्रपट आता थिएटरमध्ये धमाकेदार कमाई करत आहे. आज या चित्रपटाला सिनेमागृहात १७ दिवस झाले असून, अजूनही हा चित्रपट मज्जेदार कमाई करताना दिसत आहे. मंजुलीकाची जादू अजूनही चाहत्यांवर परिणाम करताना दिसत आहे.