'द फॅमिली मॅन' फेम अभिनेत्री विद्या बालनची आहे चुलत बहिण, किंग खानसोबतही तिने केलंय काम
अभिनेत्री विद्या बालन सध्या ‘भुल भुलैया ३’ मुळे चर्चेत आहे. ती बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक असून तिने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर स्वत:चं स्थान प्रस्थापित केलं आहे. तिने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिच्या अभिनयाचे चाहते नेहमीच कौतुक करत असतात. ‘भुल भुलैया ३’ चित्रपटातील तिच्या अभिनयाचं प्रेक्षक कौतुक करीत आहेत. कायमच अभिनयामुळे चर्चेत राहणारी विद्या आज तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आली आहे. तुम्हाला माहितीये का ? विद्या बालनची बहिण सुद्धा फिल्म इंडस्ट्रीत ॲक्टिव्ह आहे. तिची सख्खी बहिण नाही तर चुलत बहिण तिची इंडस्ट्रीत आहे.
हे देखील वाचा – अभिनेता विजय देवराकोंडाचा झाला अपघात, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल!
विद्या बालनच्या चुलत बहिणीने बॉलिवूड आणि टॉलिवूड इंडस्ट्रीत काम केलं आहे. विशेष म्हणजे तिने चित्रपटांतही आणि वेबसीरीजमध्ये सुद्धा काम केलं आहे. विद्या बालनची बहिण दुसरी तिसरी कोणी नसून ‘द फॅमिली मॅन’ वेबसीरीज फेम प्रियामणी राज आहे. प्रियामणीने गेल्या काही दिवसांपूर्वी फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत तिने स्वत: विद्या बालनची चुलत बहिण असल्याचा खुलासा होता. जरीही आम्ही दोघी बहिणी असलो तरीही आम्ही आतापर्यंत आम्ही फक्त दोनदाच भेटलोय, असाही खुलासा अभिनेत्रीने स्वत: केला आहे.
फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत प्रियामणीने सांगितलं की, “अभिनेत्री विद्या बालन माझी चुलत बहिण आहे. तिचे आजोबा माझ्या आजोबांचे मोठे भाऊ होते. त्यामुळे आम्ही नात्याने बहिणी आहोत. जरीही आम्ही बहिणी असलो तरीही आमची आतापर्यंत दोनदाच भेट झाली आहे. पहिल्यांदा एका अवॉर्ड सोहळ्याला भेट झाली होती. तो इव्हेंट विशाखापट्टनममधल्या विजाग शहरात होता. विद्याने एनटीआर सरांच्या जीवनावर आधारित असलेल्या एका चित्रपटात काम केलं होतं, त्यामुळे ती तेव्हा आली होती. आमची त्यावेळी एकमेकींसोबत गळाभेटही झाली होती.”
हे देखील वाचा – गोध्रा हत्याकांडाचं सत्य उघडकीस येणार, ‘द साबरमती रिपोर्ट’चा ट्रेलर रिलीज
“शाहरूख सरांनी आयोजित केलेल्या त्यांच्या बर्थडे पार्टीच्या इव्हेंटवेळी आमची दुसऱ्यांदा भेट झाली होती. आम्ही जेव्हाही भेटलो त्यावेळी आम्ही खूप हसून खेळूनच राहिलो. विद्याच्या स्वभावाबद्दल बोलायचं तर, ती स्वभावाने खूप प्रेमळ असून खरोखर ती खूप चांगली बहिण आहे.” प्रियामणी आणि विद्या बालनने जरीही आतापर्यंत स्क्रीन शेअर केली नसली तरी दोघींनीही एकमेकींबद्दल मीडियाच्या समोर एकमेकींबद्दल भरभरून प्रतिक्रिया दिली आहे.
प्रियामणीने २००३ मध्ये टॉलिवूडमधून फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण केलं. त्यानंतर तिने ‘चेन्नई एक्स्प्रेस’ मध्ये केलेल्या ‘वन टू थ्री फोर’ या आयटम साँगवर केलेल्या डान्समुळे ती रातोरात प्रसिद्धीझोतात आली. यानंतर तिने ‘जवान’, ‘आर्टिकल ३७०’ आणि ‘मैदान’ या बॉलिवूडपटांमध्ये काम केलं आहे. तर ‘फॅमिली मॅन’ या वेबसीरिजमधीलही तिचं काम खूप गाजलं. आता ‘फॅमिली मॅन ३’ मध्येही ती दिसणार आहे.