फोटो सौजन्य - Jio Cinema
बिग बॉस १८ : टेलिव्हिजनवरचा वादग्रस्त रिऍलिटी शो बिग बॉस १८ सध्या प्रचंड चर्चेत आहे. त्याचबरोबर बिग बॉस १८ घरातील सदस्य प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहेत. सध्या सोशल मीडियावर त्याचबरोबर देशामध्ये गाजत असलेला बिग बॉस १८ च्या सीझनमधून आतापर्यत ३ सदस्य घराबाहेर झाले आहेत. यामध्ये गुणरत्न सदावर्ते यांना त्याच्या वैयत्तिक कारणामुळे घराबाहेर जावे लागले होते. त्यानंतर प्रेक्षकांच्या मतानुसार मागील आठवड्यामध्ये हिमा शर्मा उर्फ वायरल भाभीला घराबाहेरच रस्ता दाखवण्यात आला होता. त्यानंतर कालच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागामध्ये घरामधील सदस्यांनी मुस्कान बामणेला घराबाहेर काढले आहे.
आज बिग बॉस १८ चा तिसऱ्या आठवड्याचा विकेंडचा वॉर रंगणार आहे. यामध्ये सलमान खान कोणाची शाळा घेणार आणि कशाप्रकारे घरामधील स्पर्धकांना समजावणार याकडे चाहत्यांचे लक्ष्य लागले आहे. काल घरामध्ये ३ सदस्यांवर एक्सपायरी सूनची टांगती तलवार होती. यामध्ये घरांमधील सदस्यांना सांगण्यात आले होते की, ज्या सदस्याचे घरामध्ये वावरणं कमी आहे त्यांना घराबाहेरचा रस्ता दाखवायचा आहे. यामध्ये तेजिंदर बग्गा यांना घरातील चार सदस्यांनी गेट आऊटचे स्टिकर लावले आहे यामध्ये शिल्पा शिरोडकर, एलिस कौशिक, व्हिव्हियन डिसेना आणि इशा यांनी घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट केले. तर सारा अरफीन खानला तीन सदस्यांनी गेट आऊटचे स्टिकर लावले, यामध्ये शेहजादा धामी, नायरा आणि अविनाश मिश्रा यांनी तिला घराबाहेर जाण्यसाठी निवडले.
त्यानंतर घरामधील सहा सदस्यांनी मुस्कान बामणेला घराबाहेर काढण्यासाठी निवडले यामध्ये करणवीर मेहरा, श्रुतिका अर्जुन, रजत, चाहत पांडे आणि चुम नारंग या नावांचा समावेश आहे. सर्वात जास्त मत मुस्कान बामणे घराबाहेर काढण्यासाठी देण्यात आली त्यामुळे तिला घराबाहेर जावे लागले आहे. परंतु आता बिग बॉसच्या घरामधून आणखी एक सदस्य कमी होणार आहे. अनेक सोशल मीडिया हॅन्डलवर घोषित करण्यात आले आहे की नायरा बॅनर्जीला घराबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. त्यामुळे आता सोशल मीडियावर मोठा गोंधळ उडाला आहे. नायरा बॅनर्जीला प्रेक्षकांच्या कमी मतामुळे तिला घराबाहेर करण्यात आले आहे.
Nyrraa got evicted. ☹️💔#NyrraaMBanerji #BB18 #BiggBoss18 pic.twitter.com/WFIoMW0sak
— Rahul⚡ (@BiggBossDude) October 25, 2024
चाहत पांडे आणि अविनाश मिश्रा यांच्यामध्ये या आठवड्यात कडाक्याचा वाद पाहायला मिळाला आहे. त्यानंतर अविनाश मिश्राने चाहत पांडेला बरेच सुनावले होते. आता या वादानंतर दोघांच्या घरामधील सदस्यांना बोलावण्यात आले आहे. यामध्ये चाहत पांडे आणि अविनाश मिश्रा या दोघांच्या आई त्यांच्या मुलांसाठी लढताना दिसत आहेत.