(फोटो सौजन्य - x अकाउंट)
गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचे विमान कोसळले आहे. या बातमीने सगळेच धक्क झाले आहेत. या विमानात २४२ प्रवासी होते. हा अपघात इतका भयानक होता की एका सेकंदात सर्व काही जळून खाक झाले. सामान्य लोकांपासून ते चित्रपटातील कलाकारांपर्यंत सर्वजण या अपघातावर दुःख व्यक्त करत आहेत. यामध्ये बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा, सनी देओल आणि ब्रिटिश गायिका जास्मिन वालिया यांच्यासह अनेकांची नावे आहेत. हे सगळे कलाकार पीडित कुटुंबासाठी प्रार्थना देखील करत आहेत.
परिणीती आणि जान्हवीने पोस्ट शेअर केली
परिणीती चोप्राने तिच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्रीने लिहिले आहे की, ‘आज एअर इंडिया विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांच्या वेदनांची कल्पनाही करता येत नाही. या दुःखाच्या वेळी मी देवाला त्यांना शक्ती देण्याची प्रार्थना करते.’ त्याच वेळी, अभिनेत्री जान्हवी कपूरने लिहिले आहे की, ‘अहमदाबादहून उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच एअर इंडियाच्या विमानाच्या अपघाताची बातमी ऐकून मला धक्का बसला आहे. अशा दुर्घटनांचे दुःख शब्दात व्यक्त करणे अशक्य आहे. प्रवासी, कर्मचारी आणि प्रत्येक पीडित कुटुंबासाठी माझ्या मनःपूर्वक प्रार्थना’.
सनी देओलने व्यक्त केले दुःख
अहमदाबाद विमान अपघाताबद्दल दुःख व्यक्त करताना सनी देओलने त्याच्या एक्स अकाउंटवर पोस्ट शेअर करत लिहिले, अहमदाबादमधील विमान अपघाताची बातमी ऐकून मला धक्का बसला आहे. ही बातमी ऐकल्यापासून मनापासून प्रार्थना करत आहे कुटुंब सापडावेत आणि त्यांना आवश्यक असलेली सुविधा मिळावी. सनीने पुढे लिहिले की ज्यांनी आपले प्राण गमावले आहेत त्यांच्या आत्म्याला शांती मिळो आणि त्यांच्या कुटुंबियांना या अकल्पनीय काळात शक्ती मिळो.’
Devastated by the news of the plane crash in Ahmedabad.
Praying with all my heart for survivors — may they be found and receive the care they need.
May those who lost their lives rest in peace, and may their families find strength in this unimaginable time. 🙏— Sunny Deol (@iamsunnydeol) June 12, 2025
Housefull 5: रोज चित्रपटाच्या नावावर नवा रेकॉर्ड; आता अक्षयने स्वतःच्याच ‘या’ चित्रपटाला टाकले मागे!
रितेश देशमुख म्हणाला- ‘हे ऐकून माझे मन दुखावले आहे’
रितेश देशमुखने ट्विटरवर एक पोस्ट देखील शेअर केली आहे. त्याने लिहिले आहे की, ‘अहमदाबादमधील विमान अपघाताची दुःखद बातमी ऐकून माझे मन पूर्णपणे दुखावले आहे. मला खूप दुःख झाले आहे. सर्व प्रवाशांसोबत, त असेच त्यांच्या कुटुंबासोबत सर्वांसोबत माझ्या संवेदना आहेत. या कठीण काळात मी त्यांच्या सर्वांसाठी प्रार्थना करतो’. असे अभिनेत्याने म्हटले आहे.
Absolutely heartbroken and in shock after hearing about the tragic plane crash in Ahmedabad. My heart goes out to all the passengers, their families, and everyone affected on the ground. Holding them all in my thoughts and prayers during this incredibly difficult time.
— Riteish Deshmukh (@Riteishd) June 12, 2025