(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
‘जॉली एलएलबी ३’ चा टीझर प्रदर्शित होताच लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच लोकांनी या चित्रपटाला ब्लॉकबस्टर म्हटले आहे. अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांच्या चित्रपटाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझरने एक मोठा टप्पा ओलांडला आहे. जॉली एलएलबी ३ च्या टीझरला सर्व प्लॅटफॉर्मवर २.५ कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. चाहते या कोर्टरूम कॉमेडीच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. तसेच चित्रपटाच्या टीझरमध्ये अक्षय कुमार आणि अर्शद वारसी जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळत आहे.
स्टार स्टुडिओजने सोशल मीडियावर हा टीझर शेअर केला आहे आणि लिहिले, “JollyVSJolly चा टीझरने २५ दशलक्षांपेक्षा जास्त व्ह्यूज ओलांडले आहे. तुम्ही तो पाहिला का? १९ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणाऱ्या जॉली एल एल बी ३ या चित्रपटासाठी सज्ज व्हा.’ या ट्रेलरच्या यशामुळे, हा चित्रपट आता वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांच्या यादीत समाविष्ट झाला आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.
तर ‘ही’ अभिनेत्री आहे गश्मीरची क्रश! स्वतः अभिनेत्याने केला खुलासा… नाव जाणून घ्याच!
कमी वेळात २५ दशलक्ष व्ह्यूज ओलांडले
टीझरच्या रेकॉर्डब्रेक व्ह्यूजमुळे चित्रपटाच्या चाहत्यांचा उत्साह वाढला आहे. चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर कानपूरचे वकील जगदीश्वर “जॉली” मिश्रा, यांची भूमिका अक्षय कुमारने साकारली आहे आणि मेरठचे खरे वकील जगदीश “जॉली” त्यागी, याची भूमिका अर्शद वारसीने साकारली आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागात अर्शद वारसी आणि दुसऱ्या भागात अक्षय कुमार दिसला होता आणि आता हे दोघेही तिसऱ्या भागात एकत्र येत आहेत. आता चित्रपटाच्या तिसऱ्या भागात हे दोन “जॉली” काय धुमाकूळ घालतायत हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली
जॉली एलएलबी ३ च्या टीझरने कमी वेळातच २५ दशलक्ष व्ह्यूज मिळवून लोकांचे मनोरंजन केले आहे, तर चित्रपटाच्या प्रचंड यशाचीही झलक दाखवली आहे. प्रेक्षकांची इतकी मोठी उत्सुकता यावरून दिसून येते की १९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणारा हा चित्रपट पहिल्याच दिवशी प्रचंड कमाई करेल. या जबरदस्त प्रतिसादावरून हे सिद्ध होते की स्मार्ट, मजेदार आणि अनोख्या भारतीय कोर्टरूम कॉमेडीची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.
तर ‘ही’ अभिनेत्री आहे गश्मीरची क्रश! स्वतः अभिनेत्याने केला खुलासा… नाव जाणून घ्याच!
“Jolly VS Jolly” करणार प्रेक्षकांचं मनोरंजन
सुभाष कपूर लिखित आणि दिग्दर्शित, जॉली एलएलबी ३ हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. जॉली एलएलबी ३ हा लोकप्रिय कायदेशीर विनोदी-नाटक फ्रँचायझीचा तिसरा भाग आहे. स्टार स्टुडिओज निर्मित या चित्रपटात अक्षय कुमार आणि अर्शद वारसी जॉली नावाच्या दोन वेगवेगळ्या वकिलांची भूमिका साकारताना दिसतील. यात सौरभ शुक्ला, हुमा कुरेशी आणि अमृता राव यांच्याही भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.