अनंत राधिकाच्या लग्नाला अक्षय कुमारची अनुपस्थिती COVID-19 चाचणी आली पॉझिटिव्ह
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा आज लग्नसोहळा पार पडणार असून बॉलीवूड सह हॉलिवूड मधील मंडळीदेखील लग्नाला हजेरी लावत आहेत. अशातच अभिनेता अक्षय कुमार मात्र या शाही विवाह सोहळ्याला उपस्थित राहू शकणार नाही. याचे कारण अक्षयची COVID-19 चाचणी पॉसिटीव्ह आली आहे. अक्षयने यापूर्वी कोरोना महामारीच्या सुरुवातीच्या दिवसांमध्येही चाचणी केली होती जी पॉसिटीव्ह आली होती. आणि त्यानंतर पुन्हा 2022 मध्येही अक्षयची कोरोना चाचणी पॉसिटीव्ह आली. आणि आता तिसऱ्यांदा अक्षयला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. या कारणामुळेच अभिनेता केवळ अंबानी वेदडींगला हजेरी लावू शकणार नाही. तर आजच अक्षयचा नवीन चित्रपट प्रदर्शित झाला आहे त्याच्या रिलीज प्रोमोशन चा टप्पादेखील तो वगळणार आहे.
अक्षयने या वर्षाच्या सुरुवातीला जामनगरमध्ये अंबानींच्या लग्नाआधीच्या सोहळ्याला हजेरी लावली होती. जिथे त्याने जबरदस्त नृत्य सादर केले. त्याच्या प्रमोशन टीममधील काही क्रू सदस्यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्यानंतर अक्षयला याबद्दल काळजी वाटू लागली. शुक्रवारी सकाळी त्याची COVID-19 चाचणी पॉझिटिव्ह आली. अनंत अंबानी यांनी स्वतः वैयक्तिकरित्या अक्षय कुमारला त्यांच्या लग्नासाठी आमंत्रित केले होते. ज्यात अक्षय उपस्थित राहू शकणार नाही कारण त्याने कोरोनाची लागण झाल्यामुळे स्वतःला आयसोलेट करून घेतले आहे.
अक्षय आपला नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट ‘सरफिरा’ च्या प्रमोशनसाठी फिरत होता. आणि त्यादरम्यान गेल्याकाही दिवसांपासून अक्षयला त्याची तब्येत बिघडत असल्याचे जाणवत होते. त्यांनतर त्याने स्वतःची कोविड-19 चाचणी केली. आणि ती पॉसिटीव्ह आली. आता तो डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य ती ट्रीटमेंट घेत आहे. कदाचित मान्सूनच्या सुरुवातीमुळे कोविड-19 चा पुन्हा एकदा उद्रेक झाला आहे. आणि त्यामुळे सगळीकडेच अशी परिस्थिती दिसून येत आहे.