(फोटो सौजन्य- Xअकाउंट)
आलिया भट्ट तिच्या करिअरमध्ये जसजशी प्रगती करत आहे, तसतशी ती तिच्या पात्रांमध्ये प्रयोग करत आहे. तिचा ‘जिगरा’ हा चित्रपट ऑक्टोबर महिन्यात चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून, त्यात अभिनेत्रीची दमदार ॲक्शन पाहायला मिळणार आहे. या चित्रपटानंतर यशराज बॅनरखाली बनत असलेल्या ‘अल्फा’ या पहिल्या महिला स्पाय थ्रिलर चित्रपटात आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसणार आहे, ज्यामध्ये तिच्यासोबत ‘मुंज्या’ अभिनेत्री शर्वरी वाघही दिसणार आहे. अलीकडेच निर्मात्यांनी ‘अल्फा’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.
‘अल्फा’मध्ये दिसणार आलिया भट्टची धमाकेदार ॲक्शन
ज्याप्रमाणे दिनेश विजन यांनी आपले संपूर्ण ‘हॉरर कॉमेडी युनिव्हर्स’ तयार केले आहे, त्याचप्रमाणे यशराज फिल्म्सचे संपूर्ण ‘स्पाय युनिव्हर्स’ आहे, ज्यामध्ये आतापर्यंत एक था टायगर, टायगर जिंदा है, पठाण, युद्ध आणि टायगर 3 यांसाख्या चित्रपटांचा समावेश आहे. अनेक धमाकेदार चित्रपट त्यांनी बनवले आहेत. ज्यामध्ये एकापेक्षा एक सुपरस्टार दिसले आहेत. एखाद्या अभिनेत्रीने स्पाय थ्रिलर चित्रपटाचा भार पूर्णपणे आपल्या खांद्यावर घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. ट्रेड ॲनालिस्ट तरण आदर्श यांनी अधिकृतपणे आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ स्टारर ‘अल्फा’च्या रिलीजची तारीख जाहीर केली आहे.
ALIA BHATT – SHARVARI: YRF LOCKS CHRISTMAS 2025 FOR ‘ALPHA’… #YRFSpyUniverse‘s first female-led spy film #Alpha to release on 25 Dec 2025 #Christmas… In #Hindi, #Tamil and #Telugu.#AliaBhatt and #Sharvari star in #Alpha, directed by #ShivRawail [#TheRailwayMen]… Produced… pic.twitter.com/gL5GZmTgut
— taran adarsh (@taran_adarsh) October 4, 2024
हे देखील वाचा- ZEE5 ने केली ‘मिथ्या’ 2 ची घोषणा; भरगच्च नाट्य, थरार कथेचं वळणं घेऊन हुमा कुरेशी आणि अवंतिका दासानी सज्ज!
‘अल्फा’ तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे
आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ स्टारर ‘अल्फा’ चित्रपट तीन वेगवेगळ्या भाषांमध्ये रिलीज होणार आहे. मुख्य भाषा हिंदी व्यतिरिक्त, ते तामिळ आणि तेलगूमध्ये देखील प्रदर्शित होणार आहे. शिव रवैल यांनी ब्लॉकबस्टर चित्रपट ‘धूम-3’, शाहरुख खानचा चित्रपट ‘फॅन’ आणि आर माधवनचा ‘द रेल्वे मॅन’ चित्रपट दिग्दर्शित केला आहे. आलिया भट्टच्या मोस्ट अवेटेड चित्रपटाचा बहुतांश भाग काश्मीरमध्ये शूट होणार आहे. सध्या, अभिनेत्री तिच्या आगामी ‘जिगरा’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे, जो 11 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे आणि विकी-विद्याच्या व्हिडिओ या चित्रपटाला टक्कर देणार आहे.