Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘श्रीदेवीला अटक करण्यासाठी पोलीस आता स्वर्गात जाणार का?’, राम गोपाल वर्मा यांचा का झाला संताप?

अल्लू अर्जुनच्या अटकेवर राम गोपाल वर्मा यांनी पुन्हा एकदा संताप व्यक्त केला आहे. तसेच, त्याची तुलना दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीशी संबंधित एका प्रकरणाशी करताना दिसले आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Dec 20, 2024 | 06:13 PM
फोटो सौजन्य - social media

फोटो सौजन्य - social media

Follow Us
Close
Follow Us:

चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा पुन्हा एकदा तेलगू स्टार अल्लू अर्जुनच्या समर्थनार्थ समोर आले आहेत. त्यांनी अलीकडेच ‘पुष्पा 2: द रुल’ च्या हैदराबाद प्रीमियरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीनंतर अल्लू अर्जुनच्या अटकेवर टीका केली ज्यामुळे एका महिला चाहत्याचा मृत्यू झाला. ही घटना संध्या थिएटरमध्ये घडली, जिथे सुपरस्टारला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. आता राम गोपाल वर्मा यांनी अभिनेत्यांना अन्यायकारक अटक समजून निषेध करण्याचे आवाहन केले आहे. दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी अभिनीत ‘क्षण क्षनम’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान घडलेल्या अशाच शोकांतिकेशीही त्यांनी त्याची तुलना केली.

स्टार असणे गुन्हा आहे का?
अलीकडेच, राम गोपाल वर्मा यांनी त्यांच्या अधिकृत X खात्यावर (पूर्वीचे ट्विटर) अल्लू अर्जुनचा बचाव केला, असे म्हटले की सेलिब्रिटींना त्यांच्या प्रचंड लोकप्रियतेच्या परिणामांसाठी जबाबदार धरले जाऊ शकत नाही. त्यांनी लिहिले की, ‘प्रत्येक स्टारने अल्लू अर्जुनच्या अटकेचा तीव्र निषेध केला पाहिजे कारण कोणत्याही सेलिब्रिटीसाठी, मग तो चित्रपट स्टार असो किंवा राजकीय स्टार, त्यांच्यासाठी अत्यंत लोकप्रिय होणे हा गुन्हा आहे का?’ असे त्यांनी सांगितले.

 

Every STAR should STRONGLY protest against @alluarjun ‘s ARREST because for any celebrity whether it’s a FILM STAR or a POLITICAL STAR , is it a crime for them to be ENORMOUSLY POPULAR???

3 people died in the lakhs of crowd who came to see SRIDEVI in the shooting of my film…

— Ram Gopal Varma (@RGVzoomin) December 19, 2024

श्रीदेवीशी संबंधित घटनेची तुलना
राम गोपाल वर्मा यांनी ‘क्षण क्षनम’ च्या शूटिंगमधील एक तुलनात्मक घटना आठवली, जिथे श्रीदेवीला पाहण्यासाठी जमलेल्या प्रचंड गर्दीत तीन लोक ठार झाले होते. अर्जुनवर करण्यात आलेल्या कायदेशीर कारवाईच्या योग्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ते म्हणाले की, ‘माझ्या ‘क्षनक्षनम’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान श्रीदेवीला पाहण्यासाठी आलेल्या लाखोंच्या गर्दीत तीन लोकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे आता श्रीदेवीला अटक करण्यासाठी तेलंगणा पोलीस स्वर्गात जाणार का?’ असे त्यांनी म्हंटले.

अखेर वरुण धवन सिनेमागृहात करणार धमाकेदार एन्ट्री; ‘बेबी जॉन’ चित्रपटाला CBFC कडून मिळाले U/A प्रमाणपत्र!

अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली
‘पुष्पा’ स्टारला 13 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली होती, कारण तो आणि थिएटर व्यवस्थापन पोलिसांना त्यांच्या भेटीची माहिती देण्यात अयशस्वी ठरले, ज्यामुळे प्राणघातक चेंगराचेंगरी झाली. अर्जुनने चंचलगुडा मध्यवर्ती कारागृहात एक रात्र काढली आणि सुरुवातीला त्याला 14 दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले. मात्र, नंतर तेलंगणा उच्च न्यायालयाने त्यांना चार आठवड्यांसाठी अंतरिम जामीन मंजूर केला.

Web Title: Allu arjun case ram gopal varma support pushpa 2 star give sridevi example ask question to police

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 20, 2024 | 06:13 PM

Topics:  

  • Allu Arjun
  • Ram Gopal Varma

संबंधित बातम्या

दीपिका पदुकोण आणि संदीप वांगाच्या वादात राम गोपाल वर्मा यांनी घेतली उडी, अभिनेत्रीवर साधला निशाणा
1

दीपिका पदुकोण आणि संदीप वांगाच्या वादात राम गोपाल वर्मा यांनी घेतली उडी, अभिनेत्रीवर साधला निशाणा

‘स्पिरिट’च्या एक्झिटनंतर दीपिका पादुकोणची ॲटलीच्या चित्रपटात एन्ट्री, अल्लू अर्जुनसोबत करणार स्क्रीन शेअर
2

‘स्पिरिट’च्या एक्झिटनंतर दीपिका पादुकोणची ॲटलीच्या चित्रपटात एन्ट्री, अल्लू अर्जुनसोबत करणार स्क्रीन शेअर

अल्लू अर्जुनच्या शिरपेचात मानाचा तुरा, सरकारकडून विशेष पुरस्काराने सन्मानित
3

अल्लू अर्जुनच्या शिरपेचात मानाचा तुरा, सरकारकडून विशेष पुरस्काराने सन्मानित

Allu Arjun Waves Summit 2025: कसा बनला अल्लू अर्जुन सिक्स पॅक अ‍ॅब्सवाला साउथचा पहिला अभिनेता? स्वत: च केला खुलासा
4

Allu Arjun Waves Summit 2025: कसा बनला अल्लू अर्जुन सिक्स पॅक अ‍ॅब्सवाला साउथचा पहिला अभिनेता? स्वत: च केला खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.