(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
‘पुष्पा 2’ चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान 4 डिसेंबर 2024 रोजी हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या मुलाच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी अभिनेता अल्लू अर्जुन आज मंगळवारी रुग्णालयात त्याची भेट घेण्यासाठी पोहोचला आहे. अल्लू अर्जुन जखमी श्रीतेजच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी बेगमपेठेतील KIMS रुग्णालयात गेला होता आणि त्याची भेट घेऊन निघाला आहे. ज्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ‘पुष्पा २’च्या प्रदर्शनादरम्यान संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला होता. त्याचवेळी त्यांचा आठ वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला. अल्लू आज त्याच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी रग्णालयात पोहचला होता.
#WATCH | Hyderabad, Telangana: Actor Allu Arjun reaches KIMS hospital, Begumpet to visit Sri Teja who was injured in the Sandhya theatre incident. pic.twitter.com/TLTAir4rPF
— ANI (@ANI) January 7, 2025
रुग्णालय परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था
एएनआय या वृत्तसंस्थेनुसार अल्लू अर्जुन आज सकाळी तेलंगणातील बेगमपेट येथील KIMS हॉस्पिटलमध्ये पोहोचला, जिथे श्रीतेजला दाखल करण्यात आले आहे. अल्लू रुग्णालयात पोहोचल्यावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये हॉस्पिटलच्या आवारात प्रचंड सुरक्षा दल तैनात केलेले दिसत आहे. श्रीतेजच्या प्रकृतीची माहिती घेतल्यानंतर अभिनेता तिथून निघून गेला.
#WATCH | Hyderabad, Telangana: Actor Allu Arjun leaves from KIMS hospital, Begumpet after visiting Sri Teja who was injured in the Sandhya theatre incident. pic.twitter.com/P83efBBES0
— ANI (@ANI) January 7, 2025
श्रीतेजची प्रकृती कशी आहे?
श्रीतेजची प्रकृती आता सुधारत आहे. मुलगा डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणी अल्लू अर्जुनवर कायदेशीर कारवाई सुरू आहे. दरम्यान अल्लू अर्जुन श्रीतेजला भेटण्यासाठी रुग्णालयात गेले. अल्लू अर्जुनने चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर अनेक आठवडे व्हेंटिलेटरवर असलेल्या जखमी मुलाबद्दल चिंता व्यक्त केली. मुलाची प्रकृती आता सुधारत आहे. 24 डिसेंबर रोजी मुलाच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची सकारात्मक चिन्हे दिसली. श्रीतेजचे वडील भास्कर यांनी सांगितले की, मुलाने सुमारे 20 दिवसांनी प्रतिक्रिया दिली. यादरम्यान ते म्हणाले की अल्लू अर्जुन आणि तेलंगणाकडून मला पूर्ण पाठिंबा मिळत आहे.
चेंगराचेंगरीत महिलेला जीव गमवावा लागला
हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये ४ डिसेंबर रोजी झालेल्या चेंगराचेंगरीत भास्करची ३५ वर्षीय पत्नी रेवती यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर, शहर पोलिसांनी अल्लू अर्जुन, त्याची सुरक्षा टीम आणि थिएटर व्यवस्थापनाविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या (BNS) विविध कलमांखाली तक्रार दाखल केली होती. महिलेच्या मृत्यूप्रकरणी अल्लू अर्जुनला १३ डिसेंबरला अटक करण्यात आली होती. त्यानंतर तेलंगणा उच्च न्यायालयानेही त्यांना त्याच दिवशी चार आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला. 14 डिसेंबर रोजी त्यांची तुरुंगातून सुटका झाली. या प्रकरणी अल्लू अर्जुनची वेळोवेळी चौकशी केली जात आहे.