(फोटो सौजन्य - इंस्टाग्राम)
‘पुष्पा: द राइज’ या चित्रपटाचा पुढचा भाग ‘पुष्पा: द रुल’ (पुष्पा-2) 5 डिसेंबरला चित्रपटगृहांमध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. चित्रपटाच्या प्रतिक्षेत असलेल्या चाहत्यांनी प्री-बुकिंगही सुरू केली आहे. मुंबई, दिल्ली, बेंगळुरू आणि चंदीगड सारख्या मोठ्या शहरांमध्ये चित्रपटाची ॲडव्हान्स बुकिंग जोरात सुरू आहे. मात्र, अद्यापही अनेक ठिकाणी ॲडव्हान्स बुकिंग सुरू झालेले नाही. दिल्लीत तिकिटांची किंमत 2400 रुपयांवर पोहोचली आहे. तर मुंबई आणि बेंगळुरूमध्ये सर्वात महाग तिकिटे 1,600 आणि 1,000 रुपयांपर्यंत आहेत. आता या चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग पाहता बॉक्स ऑफिसवरचे रेकॉर्ड मोडले जातील असा अंदाज बांधला जाऊ शकतो. या चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंगच्या पहिल्याच दिवशी जवळपास 7.8 कोटी रुपयांची कमाई केली आहे. वाढते आकडे पाहता हा चित्रपट ३०० कोटींहून अधिकची ओपनिंग घेऊ शकतो असा अंदाज बांधता येतो.
चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीने बाजी मारली
कमाईच्या बाबतीत 2024 हे वर्ष प्रभासचा चित्रपट ‘कल्की’ ठरला आहे. आता पुष्पा या चित्रपटाचा कमाईचा विक्रम मोडण्याच्या तयारीत आहे. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, पुष्पा 2 पहिल्या दिवशी बंपर कमाई केली आहे. चित्रपटाच्या रिलीज आधीच चाहत्यांचे या चित्रपटाला भरभरून प्रेम मिळत आहे.
बिहारने चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीची पहिल्या दिवसाची ॲडव्हान्स बुकिंग जिंकली आहे जिथे सर्वाधिक तिकिटे विकली गेली आहेत. आत्तापर्यंत 3.48 लाख जागा तिथे ब्लॉक करण्यात आल्या आहेत. विशेष बाब म्हणजे अल्लू अर्जुन स्वतः 17 नोव्हेंबरला या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यासाठी पाटणा, बिहार येथे पोहोचला होता. यावेळी या कार्यक्रमात चाहत्यांची प्रचंड गर्दी दिसली.
येत्या काही दिवसांत तिकिटांचे दर वाढणार आहेत
चित्रपटाची क्रेझ लक्षात घेता, पैसे कमवण्यासाठी अनेक ठिकाणी त्याच्या तिकिटांच्या दरात मोठी वाढ केली जाते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 5 ते 8 डिसेंबर दरम्यान मल्टिप्लेक्सच्या तिकीट दरात 200 रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, 9 ते 16 डिसेंबर दरम्यान, 150 रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते आणि 17 ते 23 डिसेंबर दरम्यान, 50 रुपयांपर्यंत वाढ दिसून येईल.
शोबिता शिवन्नाने केली आत्महत्या; साऊथ अभिनेत्रीच्या निधनाने इंडस्ट्रीत पसरली शोककळा!
पुष्पा 2 चित्रपटामध्ये काय आहे खास?
अल्लू अर्जुनचा चित्रपट पुष्पा 2 या महिन्यात 5 डिसेंबरला रिलीज होणार आहे. पुन्हा एकदा अभिनेता पुष्पा राजचे पात्र साकारून चित्रपटात वादळ निर्माण करणार आहे. अल्लू अर्जुनसोबत या चित्रपटात रश्मिका मंदान्ना आणि फहद फासिल देखील दिसणार आहेत. त्याचे पहिले गाणे ‘किसिक’ रिलीज झाल्यानंतर इंटरनेटवर तुफान गाजले आहे. यावेळी चित्रपटातील ॲक्शन सीन्स आणखी धक्कादायक असणार आहेत. आता पुष्पा २ ला लोक किती प्रेम देतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.