(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर हे बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध ऑनस्क्रीन जोडप्यांपैकी एक आहेत. त्यांच्या ‘आशिकी २’ आणि ‘ओके जानू’ या चित्रपटांनी त्यांच्या जादुई रोमँटिक केमिस्ट्रीने प्रेक्षकांची मने जिंकली. मिळालेल्या माहितीनुसार, श्रद्धा आणि आदित्य एका रोमँटिक चित्रपटासाठी पुन्हा एकत्र दिसणार असल्याची चर्चा होत आहे. चाहते या बातमीने खूप आनंदी झाले आहेत. तसेच या दोघांची जोडी मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.
श्रद्धा आणि आदित्य एका रोमँटिक चित्रपटात एकत्र दिसणार?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुन्हा एकदा श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर ही रोमँटिक जोडी एकत्र दिसू शकते. मिळालेल्या माहितीनुसार, मोहित सुरीच्या पुढच्या चित्रपटासाठी दोन्ही स्टार एकत्र दिसणार असल्याची बातमी समोर आली आहे. हा एक रोमँटिक चित्रपट असणार आहे. तथापि, कथा आणि पटकथेवर मोहित सुरी आणि त्यांच्या क्रिएटिव्ह टीमकडून काम केले जात आहे. कदाचित येत्या आठवड्यात चित्रपटाची अधिकृत घोषणा देखील केली जाऊ शकते. परंतु याबाबत त्यांनी अद्यापही कोणतीही घोषणा केली नाही आहे.
श्रद्धा-आदित्यची जोडी प्रेक्षकांना आवडते
श्रद्धा आणि आदित्यचे चाहते त्यांना पुन्हा एकदा चित्रपटात एकत्र पाहण्यासाठी उत्सुक आहेत. त्यांच्या मागील चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, आशिकी २ हा चित्रपट खूप यशस्वी झाला होता. मोहित सुरी दिग्दर्शित हा चित्रपट प्रेक्षकांना त्याच्या प्रेमकथेसाठी, अभिनयासाठी आणि विशेषतः संगीतासाठी खूप आवडला. त्यांची गाणी आजही लोकप्रिय आहेत.
हे दोघेही शेवचे या चित्रपटामध्ये दिसले
२०१७ मध्ये, श्रद्धा आणि आदित्य यांनी ओके जानू या रोमँटिक चित्रपटातही काम केले आहे. शाद अली दिग्दर्शित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली नाही, परंतु श्रद्धा-आदित्यची जोडी सर्वांना आवडली. श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर त्यांच्या संबंधित प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहेत. श्रद्धा शेवटची हॉरर कॉमेडी ‘स्त्री २’ मध्ये दिसली होती. मॅडॉक हॉरर कॉमेडी युनिव्हर्सच्या या चित्रपटात श्रद्धा व्यतिरिक्त राजकुमार राव, अपारशक्ती खुराणा, अभिषेक बॅनर्जी आणि पंकज त्रिपाठी दिसले होते. दुसरीकडे, आदित्यने ‘द नाईट मॅनेजर’ या क्राइम थ्रिलर मालिकेतील त्याच्या कामामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत राहिला.