अर्जुन म्हणाला त्याने आयुष्यात खूप काही पाहिले आहे. त्याने खूप त्याग केला आहे.
अभिनेता अर्जुन रामपाल गेल्या दोन दशकांपासून हिंदी चित्रपटसृष्टीचा एक भाग आहे. आपल्या कारकिर्दीत त्याने पडद्यावर नायकापासून खलनायकापर्यंतच्या भूमिका साकारल्या आहेत. विद्युत जामवालसोबत क्रॅक या चित्रपटात तो शेवटचा दिसला होता. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करू शकला नाही. तो यापूर्वीही शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणसोबत ओम शांती ओममध्ये दिसला होता. त्याच्या व्यक्तिरेखेसाठी त्याला खूप पसंतीही मिळाली होती. अर्जुन रामपालने नुकतेच बिअर बायसेपच्या पॉडकास्टमध्ये शाहरुखबद्दल बोलले आहे.
काय म्हणाला अर्जुन शारुखबद्दल
अर्जुन रामपाल आणि शाहरुख खान यांचे चांगले संबंध आहेत. द रणवीर शोच्या पॉडकास्ट दरम्यान अर्जुन रामपालने शाहरुख खानसोबतच्या त्याच्या बॉन्डबद्दल आणि सुपरस्टारशी कसे बोलावे याबद्दल चर्चा केली. ज्यावर अर्जुनने म्हटले की, शाहरुख अत्यंत विचारी मनुष्य आहे. अर्जुन म्हणाला, “त्याने आयुष्यात खूप काही पाहिले आहे. त्या ने खूप त्याग केला आहे. तो इतका हुशार आहे की, तो गोष्टींचा अंदाज घेऊ शकतो. त्याची दूरदृष्टी अप्रतिम आहे. शाहरुख मेहनती आहे असे सांगताना अर्जुन पुढे म्हणाला, “तुम्ही त्याच्याकडून जे काही घेऊ शकता ते सर्व काही, चांगले गुण, त्याचे आचरण आणि त्याच्या चांगल्या सवयी आहेत. शाहरुख चांगल्या सवयी अंगीकारतो आणि त्या आपल्या व्यक्तिमत्त्वात उतरवतो.”
अर्जुनची शारुखसोबत पहिली भेट
या पॉडकास्टमध्ये अर्जुन रामपालला विचारण्यात आले की, तो शाहरुख खानला कसा भेटला? अर्जुनने खुलासा केला की तो शाहरुखला त्याची माजी पत्नी, मॉडेल मेहर जेसियाच्या माध्यमातून भेटला होता. मेहर शाहरुखची पत्नी गौरी खानची चांगली मैत्रीण होती. पहिल्या भेटीत दोघांनी एकमेकांना छान शुभेच्छा दिल्या होत्या. अर्जुन रामपाल ओम शांती ओम, दिल का रिश्ता, डॉन, आंखे, हाउसफुल, रॉय, रजनीती, आय सी यू, सत्याग्रह, रॉक ऑन आणि रॉक ऑन 2 यांसारख्या चित्रपटांसाठी ओळखला जातो.