(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
प्रेक्षकांचा प्रतिक्षेचा क्षण अखेर संपला आहे. मिस युनिव्हर्स 2021 हरनाज संधू आता आपला बॉलीवूड डेब्यू करण्यासाठी सज्ज झाली आहे आणि तीही एक्शन सुपरस्टार टायगर श्रॉफसोबत ‘बागी ४’ मध्ये ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच या चित्रपटामधील या जोडीचं पहिलं गाणं ‘गुजारा’ नुकतेच रिलीज झाले आहे. चाहत्यांना या दोघांची केमिस्ट्री खूप आवडली आहे. तसेच या नव्या जोडीचं चाहते भरभरून कौतुक देखील करत आहेत.
अली फजलच्या ‘Raakh’ वेब सिरीजची घोषणा; पोस्टर पाहून चाहते म्हणाले, ‘गुड्डू भैयाचा लूक जबरदस्त’
टायगर आणि हरनाजची रोमँटिक केमिस्ट्री दिसली
टायगर श्रॉफ आणि संजय दत्त यांच्या अॅक्शनने भरलेल्या ‘बागी ४’ या चित्रपटाचे पहिले गाणे रिलीज झाले आहे. अॅक्शन चित्रपटाचे पहिले गाणे रोमान्सने भरलेले आहे. या गाण्यात टायगर श्रॉफसोबत अभिनेत्री हरनाज कौर संधू दिसत आहे. हे गाणे पंजाबी गायक सरताज यांच्या ‘तेरे बिना ना गुजारा’ या गाण्याचे रिमेक आहे. गायक जोश ब्रार यांनी ते रिमेक करून एका नवीन पद्धतीने आणले आले आणि हे पुन्हा चर्चेत आले आहे. आता त्याच जोश ब्रार यांनी ‘बागी ४’ मध्ये या गाण्याला आपला आवाज दिला आहे. येथे गाण्याचे बोल पंजाबीऐवजी हिंदीमध्ये आहेत. गाण्यात टायगर आणि हरनाज संधू रोमान्स करताना दिसत आहेत.
‘बागी ४’ चित्रपट कधी होणार प्रदर्शित?
‘बागी ४’ हा एक अॅक्शनने भरलेला चित्रपट आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे, ज्यामध्ये ‘अॅनिमल’ आणि ‘मार्को’ सारख्या पातळीवरील अॅक्शन पाहायला मिळाली. टीझरच्या काही मिनिटांतच फक्त रक्तपात दिसून आला. ‘बागी ४’ मध्ये टायगर श्रॉफसोबत संजय दत्त, हरनाज कौर संधू आणि सोनम बाजवा सारखे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ए हर्षा दिग्दर्शित ‘बागी ४’ ५ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.
KBC 17: पहिल्याच आठवड्यात मिळाला सीझन १७ चा करोडपती, ७ कोटींच्या प्रश्नाने वेधले लक्ष
‘बागी’ फ्रँचायझी २०१६ मध्ये सुरू झाली
‘बागी ४’ हा टायगर श्रॉफ आणि साजिद नाडियाडवालाच्या ‘बागी’ फ्रँचायझीमधील चौथा चित्रपट आहे. यापूर्वी या चित्रपटाचे तीन भाग प्रदर्शित झाले आहेत. या फ्रँचायझीची सुरुवात २०१६ मध्ये ‘बागी’ या चित्रपटाने झाली होती. यानंतर २०१८ मध्ये ‘बागी २’ आला आणि २०२० मध्ये फ्रँचायझीचा तिसरा चित्रपट ‘बागी ३’ आला. पहिल्या आणि तिसऱ्या ‘बागी’ मध्ये श्रद्धा कपूर टायगर श्रॉफसोबत मुख्य भूमिकेत दिसली होती. तर ‘बागी २’ मध्ये दिशा पटानी मुख्य भूमिकेत दिसली होती. आता हरनाज संधू आणि सोनम बाजवा ‘बागी ४’ मध्ये दिसणार आहेत. आता हा चित्रपट प्रेक्षकांच्या किती पसंतीस पडतो हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.