BHUMI PEDNEKAR (फोटो सौजन्य -Instagram)
अभिनेत्री भूमी पेडणेकरअल्पवयात खूप जास्त कष्ट करून अभिनेत्रीच्या जगात यशस्वी झाली. वयाच्या ८ व्या वर्षापासूनच तिने अभियान क्षेत्रात पाऊल टाकले. आणि तिच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. खूप कमी वयात जास्त अनुभव घेणारी भूमी पेडणेकर चित्रपटसृष्टीत आघाडीची अभिनेत्री ठरली. भूमी पेडणेकरने आजवर आयुष्यात अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. आणि तिचा अभिनय आणि काम पाहून चाहते तिच्यावर फिदा झाले आहेत. भूमीच्या पहिल्या चित्रपटाला भरपूर यश मिल्यानंतर तिच्या या चित्रपटानंतर मिळालेल्या २४ चित्रपटांना नकार दिला होता.
भूमीचा पहिला चित्रपट
भूमी पेडणेकरचा पहिला चित्रपट ‘दम लगा के हईशा’ २०१५ साली प्रदर्शित झाला होता या चित्रपटामधून भूमीने या सिनेमासृष्टीत पदार्पण केले होते. या चित्रपटामध्ये ती अभिनेता आयुष्मान खुराणासह मुक्याभूमिकेत दिसली होती. या दोघांचा हा चित्रपट प्रेक्षकांना भरपूर आवडला होता. हा चित्रपट एका लठ्ठ महिलेवर आधिरीत आहे याची संपूर्ण कथा वेगळी आणि आकर्षित आहे. भूमीने या महिलेची भूमिका साकारली होती हे पात्र तिने अत्यंत हुशारीने आणि जबाबदारीने पार पडले होते. हा चित्रपट पाहून प्रेक्षकांना चांगलाच अनुभव मिळाला आहे. या भूमिकेसाठी भूमीने उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारदेखील जिंकला आहे. या चित्रपटामध्ये भूमीचे वजन ७२ किलो होते आणि या चित्रपटानंतर अवघ्या ३ महिन्यात भूमीने आपले वजन कमी केले. ‘दम लगा के हईशा’ हा चित्रपट अजूनही चाहत्यांच्या मनात घर करून आहे .
भूमीला बरेच चित्रपट मिळाले
अभिनेत्री भूमी पेडणेकरला ‘दम लगा के हईशा’ यानंतर अनेक चित्रपटाचे ऑफर्स येऊ लागल्या होत्या. ‘बधाई हो’ या चित्रपटांसारखे भूमीने सगळ्या हटके सिनेमांची निवड केली आहे. या चित्रपटानंतर तिने ‘भक्षक’, ‘लेडीकिलर’, ‘थँक्यू फॉर कमिंग’, ‘भीड’, ‘बधाई दो’, ‘शुभ मंगल सावधान’, ‘टॉयलेट- एक प्रेम कथा’, ‘बाला’, ‘लस्ट स्टोरीज’, ‘अफवा’, ‘सांड की आँख’ असे चित्रपट स्वीकारून ती या चित्रपटांचा भाग बनली आणि प्रसिद्धीच्या मार्गावर यशस्वी झाली. ‘दम लगा के हईशा’ या चित्रपटानंतर भूमी पेडणेकरला बऱ्याच चित्रपटांच्या ऑफर आल्या. तिने जवळपास २४ चित्रपट नाकारले होते. काही चित्रपटांच्या कथा तिला आवडल्या नव्हत्या तर काहींच्या तारख्या जुळून येत नव्हत्या. या कारणांमुळे अभिनेत्री भूमीने २४ चित्रपटांना नकार दिला होता.