फोटो सौजन्य - सोशल मीडिया
बिग बॉस १८ : मागील दहा आठवड्यापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असलेल्या बिग बॉस 18 सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. दिवसेंदिवस जसजसा या खेळाच्या फायनलचा दिवस जवळ येत आहेत तसतसा हा खेळ अधिकच मनोरंजक होत चालला आहे. या विकेंडच्या वॉरमध्ये फराह खानने बिग बॉसच्या घरातील सदस्यांची क्लास घेतली आणि काही सदस्यांवर कौतुकाचा वर्षाव केला. त्यामुळे या खेळाचा मोठा परिणाम झालेला खेळाडूंवर दिसत आहे. फराह खानने शनिवारी आणि रविवारच्या विकेंडच्या वॉरमध्ये करणवीर मेहराचं भरभरून कौतुक केलं आणि त्याचबरोबर त्याला मेडल देण्यात आलं. तर अनेक सदस्यांची शाळा घेतली आणि यावेळी त्यांना सांगितले की कशाप्रकारे तुम्ही करणवीर मेहराचं नाव घेऊन संपूर्ण शो मध्ये दिसत आहात.
Bigg Boss 18 : शिल्पा-विवियन नातं पुन्हा जोडणार की मोडणार? नात्याचे सत्य आलं समोर
कालच्या भागांमध्ये नॉमिनेशनची प्रक्रिया पार पडली आणि यामध्ये सहा सदस्य नॉमिनेट झाले आहेत. यात करणवीर मेहरा, विवियन डिसेना, इडन रोज, तीजेंदर बग्गा, दिग्विजय राठी आणि चाहत पांडे हे सदस्य घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत. यावेळी अविनाश मिश्राने त्याच्याच मित्राला विवियन डीसेनाला घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट केले. यावेळी त्याने करणवीर मेहरा, शिल्पा शिरोडकर आणि त्याच्या मित्राबद्दल कारण सांगितलं हे कारण ऐकून प्रेक्षक थक्क झाले. यावेळी त्यांनी करणवीर मेहरावर निशाणा साधला आणि म्हणाला की “तू ज्या प्रकारे खतरो के खिलाडी शोमध्ये केले त्याचप्रकारे तू इथेही करत आहेस त्यामुळे हा तुझा प्लान अजिबात इथे चालणार नाही. त्यानंतर आता आगामी भागामध्ये याच विषयावर बोलताना करणवीर मेहरा आणि अविनाश मिश्रा दिसणार आहेत.
Tomorrow Promo: Time God Task Kya Karanveer Almost Time God se Time God ka safar tey kar payege?pic.twitter.com/J3xrDOdtMY — #BiggBoss_Tak👁 (@BiggBoss_Tak) December 9, 2024
वायरल होत असल्याचा प्रोमोमध्ये अविनाश मित्रा करणविर मेहराला सांगतोय की “जर संपूर्ण घर करणवीर विरुद्ध विवियन तर मग मी काय करत आहे. मी तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकासाठी या खेळामध्ये खेळ खेळत आहे. यावर करणवीर मेहरा म्हणतो तू कुठे जात आहेस तू फेमस होण्यासाठी खेळत आहेस की जिंकण्यासाठी खेळत आहेस. यावर करणवीर मेहरा म्हणतो मी की, तुला सांगतो की तू नेहमी आता दुसऱ्या स्थानासाठीच खेळत आहेस. यावर अविनाश म्हणतो की मी अजिबात विवियनच्या संघासाठी खेळत नाही आहे मी माझ्यासाठी खेळत आहे. यावर कारण म्हणतो की, जेव्हा तुझी मैत्रीच्या बाहेर येशील तेव्हा तुला कळेल की हा म्हणजेच विवियन डिसेना फक्त स्वतःसाठी खेळतोय आणि मला काही सांगत नाहीये तेव्हा तुला या सगळ्या गोष्टींची जाणीव होईल आणि तुला कळेल की अरे हा तर खूप चालू माणूस आहे.