फोटो सौजन्य - Jio Cinema सोशल मीडिया
बिग बॉस 18 : बिग बॉसचा हा बारावा आठवडा वादग्रस्त राहिला. या आठवड्यात दररोज कोणत्या न कोणत्यातरी कारणावरून मोठे वाद पाहायला मिळाले. यामध्ये रजत दलाल आणि करणवीर मेहरा या दोन सदस्यांमध्ये धक्काबुक्की पाहायला मिळाली होती. तर कशिश कपूर आणि अविनाश मिश्रा यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपाचा खेळ पाहायला मिळाला होता. त्याचबरोबर कालच्या भागामध्ये अविनाश मिश्रा आणि विवियन यांच्यामध्ये सुद्धा वाद झाला होता. या आठवड्यामध्ये टाइम गॉड टास्क आणि राशन टास्क एकत्र ठेवण्यात आला होता. यामध्ये घरातले राशन पणाला लावून चुम दारंग हि या आठवड्यामध्ये टाइम गॉड झाली होती. त्यानंतर तिने घराची जाबाबदारी नीट न निभावल्यामुळे तिला टाइम गॉड पदावरून काढून टाकण्यात आले होते.
Time God Task – Partner Task
☆ Karanveer & Rajat
☆ Vivian & Chahat
☆ Shilpa & Kashish
☆ Eisha & Sara
☆ Avinash & ChumShrutika as Sanchalak
Which pair will win the task?
— #BiggBoss_Tak👁 (@BiggBoss_Tak) December 25, 2024
आता आगामी भागामध्ये टाइम गॉड टास्कसाठी पुन्हा बिग बॉस टास्क आयोजित करणार आहेत. यामध्ये हा टास्क बिग बॉसने जोड्यांमध्ये आयोजित केला आहे. करणवीर मेहरा आणि रजत दलाल, विवियन डीसेना आणि चाहत पांडे, शिल्पा शिरोडकर आणि कशिश कपूर, ईशा सिंह आणि सारा खान, अविनाश मिश्रा आणि चुम दारंग अशाप्रकारे जोड्या तयार करण्यात आल्या होत्या. संचालक म्हणून श्रुतिका अर्जुनची निवड करण्यात आली होती. या टास्कमध्ये जोडीदाराने स्कीस घालणे आणि ट्रॅकवर चालणे गरजेचे होते. जर कोणी जोडीदार खाली पडला तर दुसरी जोडी टास्क सुरू ठेवू शकते आणि शेवटी एक जोडी टास्क जिंकणार होती. यामध्ये आता विजय मिळवून चुम दारंग आता पुन्हा दुसऱ्यांदा टाइम गॉड झाली आहे.
🚨 BREAKING! Chum Darang has become the Time God once again.
— #BiggBoss_Tak👁 (@BiggBoss_Tak) December 25, 2024
बिग बॉस तकच्या नुसार, बिग बॉसच्या बातम्या देणारे सोशल मीडिया पेज, विवियन आणि चाहत या शर्यतीतून सर्वात आधी बाहेर आहेत. मग शिल्पा बाहेर पडते आणि अशा प्रकारे शेवटी चुम दारंग टास्क जिंकते. चुम जेव्हा टाइम गॉड बनला तेव्हा एका यूजरने लिहिले, ‘पुन्हा?’ दुसऱ्याने लिहिले, ‘आता मजा येईल. करण वीर यांच्या गटात सत्ता आली आहे. तिसऱ्याने लिहिले, ‘व्वा! चुम दारंग यांचे अभिनंदन. इतक्या दिवसांनंतर करण वीर मेहराच्या ग्रुपचा एक सदस्य बिग बॉस 18 चा टाइम गॉड बनला आहे.
या आठवड्यामध्ये सात सदस्य घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहे. यामध्ये विवियन डिसेना, अविनाश मिश्रा, इशा सिंह, रजत दलाल, सारा खान, कशिश कपूर, आणि चाहत पांडे हे सदस्य घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत. यामध्ये या आठवड्यात दुहेरी एव्हिक्शन होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये कशिश कपूर आणि सारा खान या दोन सदस्यांचे बाहेर जाण्याचे चान्स जास्त आहेत.