
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
“बिग बॉस १९” च्या ग्रँड फिनालेसाठी फक्त दोन आठवडे शिल्लक राहिले आहेत आणि त्यानंतर या सीझनचा विजेता जाहीर केला जाणार आहे. सध्या, संपूर्ण घरामधील सदस्य नॉमिनेट झाले असून, फक्त हाऊस कॅप्टन शाहबाज सेफ आहे. घरात नऊ सदस्य शिल्लक आहेत आणि १३ वा आठवडा सुरू झाला आहे. १२ व्या आठवड्यात कोणीही घराबाहेर गेल्या नसल्यामुळे, सर्व सदस्य वाचले, परंतु पुढील आठवड्यासाठी देखील त्यांना नामांकन देण्यात आले आहे. याचा अर्थ असा की घराबाहेर होण्याचा धोका अजूनही कायम आहे आणि या वीकेंड का वारमध्ये दोन सदस्य जाण्याची शक्यता आहे. तसेच आता आपण कोणता किती वोट मिळालेले आहेत हे जाणून घेणार आहोत.
‘व्हिडीओ शेअर करू नका..’, गर्लफ्रेंडसोबतच्या व्हायरल MMS वर सोफी एसकेने सोडले मौन; केली विनंती
कोणाला सर्वाधिक आणि कोणाला कमी मते आहेत?
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या “बिग बॉस १९” च्या मतदानाच्या ट्रेंडनुसार, प्रणीत मोरेला सर्वाधिक मते (२३,३९२) मिळाली आहेत. गौरव खन्ना २०,४४४ मतांसह दुसऱ्या स्थानावर आहेत. फरहाना भट्ट ११,२८९ मतांसह तिसऱ्या स्थानावर आहेत. अशनूर कौर फक्त ९,६८१ मतांसह चौथ्या स्थानावर आहेत. तान्या मित्तल ६,३१८ मतांसह पाचव्या स्थानावर आहेत. परंतु, याची पुष्टी करण्यात आलेली नाही.
अमाल मलिक तान्यापेक्षा मागे, तो टॉप ५ मधून पडेल बाहेर?
मतदानाच्या ट्रेंडमध्ये अमाल मलिक सध्या तान्यापेक्षाही मागे आहे, ही एक आश्चर्यकारक परिस्थिती निर्माण करत आहे. अमालला फक्त ३,७४२ मते मिळाली आणि ती सहाव्या स्थानावर आहे. मालती चहर आणि कुनिका सदानंद शेवटच्या दोन सदस्यांमध्ये आहेत. मालतीला २,४५५ मते मिळाली, तर कुनिकाला सर्वात कमी ३५६ मते मिळाली आहेत. याचा अर्थ असा की जर एकच स्पर्धक घराबाहेर गेला तर कुनिका बाहेर पडण्याची शक्यता आहे आणि जर दुहेरी नॉमिनेशन झाला तर कुनिका आणि मालती बाहेर पडतील हे निश्चित आहे.
हार्दिक पांड्याने गुपचूप उरकला साखरपुडा? कथित गर्लफ्रेंड महिका शर्मासोबतच्या पोस्टने वेधले लक्ष
नवीन मतदानाच्या ट्रेंडमधील धक्कादायक आकडेवारी
परंतु, हा मतदानाचा ट्रेंड फक्त काही तासांचा आहे. मतदानाची वेळ फक्त शुक्रवार, २१ नोव्हेंबरपर्यंत खुल्या असल्याने, चाहत्यांना त्यांच्या आवडत्या स्पर्धकाला वाचवण्याची पूर्ण संधी आहे. म्हणूनच ते उत्साहात मतदान करत आहेत. biggbossvote.net नुसार, २० नोव्हेंबर रोजी रात्री १२:०४ वाजेपर्यंत, प्रणीत मोरे यांना सर्वाधिक ५७,१५७ मते मिळाली आहेत. गौरव खन्ना दुसऱ्या स्थानावर आहेत, ज्यांच्यासोबत प्रणीतची जबरदस्त टक्कर दिसून येत आहे. गौरवला ४४,०८५ मते मिळाली आहेत. फरहानाने तिसऱ्या स्थानावर आपले स्थान कायम ठेवले आहे.