(फोटो सौजन्य- Instagram)
एकता आर कपूर आणि महावीर जैन एक कौटुंबिक कथा रुपेरी पडद्यावर आणण्यासाठी सज्ज आहेत जी प्रत्येक पिढीला मनोरंजन करणार आहे. या वर्षाच्या सुरुवातीला जाहीर झालेला त्यांचा “बिन्नी अँड फॅमिली” हा चित्रपट आता चर्चेत असताना सगळेच त्यासाठी उत्सुक आहेत. शशांक खेतान (बद्रीनाथ की दुल्हनिया आणि हम्प्टी शर्मा की दुल्हनिया) आणि मृघदीप सिंग लांबा (फुक्रे फ्रँचायझी) हे दोन प्रतिष्ठित चित्रपट निर्मात्यांसोबत सामील होत आहेत जे प्रेक्षकांना थिएटरमध्ये नक्कीच काहीतरी वेगळं घेऊन येणार आहेत.
कौटुंबिक मनोरंजन करणारा ‘बिन्नी अँड फॅमिली’ लवकरच प्रेक्षकांची मन जिंकणार आहे. हा चित्रपट सर्व वयोगटातील प्रेक्षकांना आवडणारा चित्रपट आहे. प्रेक्षकांच्या पसंतीस येईल हा विचार करूनच या चित्रपटाची कथा आधारित आहे. हा चित्रपट एकता आर कपूरच्या बालाजी टेलिफिल्म्स, निर्माते महावीर जैन फिल्म्स आणि वेव्हबँड प्रॉडक्शन्स आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते शशांक खेतान आणि मृघदीप लांबा यांच्यातील खास सहकार्य आहे. चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन संजय त्रिपाठी यांनी केले आहे.
तसेच, “बिन्नी अँड फॅमिली” या चित्रपटाच्या निर्मात्यांनी नुकताच चित्रपटाचा पहिला लूक प्रेक्षकांच्या समोर आणला आहे. ज्यात अंजिनी धवन आणि नमन त्रिपाठी या नव्या कलाकारांची ओळख या पोस्टरद्वारे दिसून येत आहे. हे फ्रेश चेहरे इंडस्ट्रीत नवी ऊर्जा निर्माण करून प्रेक्षकांचं मनोरंजन करतील यात शंका नाही. तसेच या चित्रपटात पंकज कपूर, राजेश कुमार, हिमानी शिवपुरी आणि चारू शंकर यांच्याही भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
‘बिन्नी अँड फॅमिली’ ही प्रत्येक पिढीसाठी एक संदेश देणारी कथा आहे. पहिले पोस्टर हे खूप कमालीचं असून आता चित्रपटात काय बघायला मिळणार हे प्रेक्षकांसाठी उत्कंठावर्धक ठरणार आहे. या चित्रपटाविषयी बोलताना महावीर जैन म्हणाले, “आजच्या काळात आणि गडद चित्रपटांना अधिक महत्त्व प्राप्त होत असताना आम्ही एक संपूर्ण कौटुंबिक चित्रपट घेऊन येत आहोत जो तुम्ही तुमच्या संपूर्ण कुटुंबासमवेत बघू शकता. हा चित्रपट प्रत्येक पिढीशी संवाद साधणारा आहे मग तो तरुण असो, किशोरवयीन असो, मध्यमवयीन असो किंवा वृद्ध असो, हा चित्रपट कुटुंबांना एकत्र आणेल आणि तो पाहण्यासाठी मी आमच्या प्रेक्षकांची प्रतीक्षा करू शकत नाही.” असे त्यांनी सांगितले.
पूर्वी एकता आर कपूरने या चित्रपटाबद्दल तिचे मनापासून मत व्यक्त केले आणि हा चित्रपट तिच्या प्रकारातील आहे असे संगितले होते. तिने कुटुंबांमधील पिढीतील अंतराचे सुंदर चित्रण आणि एकत्र जीवन साजरे करण्याच्या प्रगल्भ दृष्टीकोनाची प्रशंसा या चित्रपटामध्ये दाखणव्यात येणार आहे असे ती म्हणाली आहे. आता हा चित्रपट ३० ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार असून त्यात “हर जनरेशन कुछ कहता है” असा संदेश देण्यात आला आहे. तुम्ही कोणत्या पिढीचे आहात हे महत्त्वाचे नाही, ‘बिन्नी अँड फॅमिली’ तुमच्यासाठी आपल्या सर्वांना जोडणारी कथा घेऊन येणार आहे. त्यामुळे या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत.