बॉलिवूड अभिनेत्री ते आयपीएस अधिकारी; भोपाळची 'ही' तरुणी तुम्हाला माहितेय का ?
बॉलीवूडमधून नावारुपाला आलेल्या अभिनेत्रीने अभिनयाला चक्का रामराम करुन देशसेवेचं कार्य हाती घेतलं आहे.
या अभिनेत्रीने आपल्या सौंदर्याने सिनेविश्वाला भुरळ घातली होती. ही अभिनेत्री म्हणजे सिमला प्रसाद .
सिमला प्रसाद या बॉलीवूडमधील अभिनयाची कारकिर्द सोडून सध्या त्या पोलीस दलात देशसेवा करत आहेत.
सिमला यांना लहानपणापासून कलेची आवड आहे. त्यांनी लहानपणीच डान्स आणि अभिनयाचे धडे गिरवले होते.
सिमला यांनी 2019 प्रदर्शित झालेला 'नकाश' आणि 2017 मधील 'अलीफ' या सिनेमातून त्यांनी मुख्य भूमिका साकारली होती.
मुळच्या भोपाळच्या असलेल्या सीमालाने बी.कॉमचं शिक्षण पूर्ण करत महाविद्यालयीन नाटकात कामं केलं होतं.
कलेबरोबरचं सिमला यांना राजकारम आणि समाजशास्त्रात देखील रस होता, त्यामुळे त्यांनी स्पर्धा परिक्षा दिली होती.
पीएससीच्या पहिल्याच अटेंप्टमध्ये सिमला उत्तीर्ण झाल्या. त्यानंतर त्यांची डीएसपी म्हणून पोस्टींग झाली.
मला कधी वाटलं नव्हतं मी या गणवेशात स्वत:ला बघेल, त्यामुळे सुरक्षादलात काम करताना मला आनंद होत आहे. असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं.