(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
दशावतार या बहुप्रतिक्षित सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होतं, अखेर हा सिनेमा 12सप्टेंबर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाने 12 सप्टेंबरला एक दोन नाही तर तब्बल तीन मराठी सिनेमे रिलीज झालेत. बॉक्स ऑफिसवर सध्या हिंदी सोबतच मराठी चित्रपटांची तगडी स्पर्धा रंगल्याचे पाहायला मिळत आहे. शुक्रवारी मराठीमध्ये एक नाही तर तीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. दशावतार, आरपार, आणि बिन लग्नाची गोष्ट असे तीन तीन मराठी चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाले आहेत.
दशावतार ,आरपार आणि बिन लग्नाची गोष्ट या तिन्ही चित्रपटांची सोशल मिडियावर जोरदार चर्चा सुरू होती. हे तिन्ही चित्रपट वेगवेगळ्या कारणांमुळे खास आहेत. या चित्रपटांची पहिल्या दिवसांची आकडेवारी समोर आली आहे. यात दशावतार या चित्रपटाने सॅकनिल्क’च्या सुरुवातीच्या अंदाजानुसार बाजी मारली आहे.
दुसरीकडे या चित्रपटांपैकी कोणत्या चित्रपटाने सर्वाधिक कमाई केली आहे. हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.’दशावतार’च्या शूटिंगआधी दिलीप प्रभावळकर यांना झालेला चिकनगुनिया; म्हणाले, ‘माझ्या शरीराला सूज… ‘ ‘दशावतार’चे टीझर आणि ट्रेलर आल्यानंतर सिनेमाची उत्सुकता वाढली होती.
जुनैद आणि साई पल्लवीच्या आगामी चित्रपटाचे नाव उघड, १७ वर्षांनंतर रंगणार आमिर – मन्सूरची जोडी
दशावतार चित्रपटाची कमाई?
सॅकनिल्क’च्या आकड्यांनुसार दशावतार सिनेमानं पहिल्याच दिवशी वर्ल्डवाइड तब्बल ६५ लाखांची कमाई केली आहे. तर भारतात सिनेमानं ५८ लाखांचा गल्ला जमवला आहे.
‘आरपार’ चित्रपटाला कसा प्रतिसाद मिळतोय?
आरपार या चित्रपट मराठी चित्रपट देखील शुक्रवारी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात ललित प्रभाकर आणि हृता दुर्गुळे यांची प्रमुख भूमिका असल्याचे पाहायला मिळत आहे.माधव अभ्यंकर, सुहिता थत्ते, स्नहलता वसईकर यांच्याही या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 13 लाख रुपयांची कमाई केली आहे.
‘बिन लग्नाची गोष्ट’ चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती?
सॅकलिंक या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दलची माहिती देणाऱ्या वेबसाईटवर या चित्रपटाने प्रदर्शनानंतर 8 लाखांची कमाई केल्याचे म्हटले आहे. ‘बिन लग्नाची गोष्ट’ हा चित्रपट शुक्रवारी म्हणजेच 12 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे.