(फोटो सौजन्य-सोशल मिडीया)
चिनी अभिनेता, गायक आणि संगीत व्हिडिओ दिग्दर्शक अॅलन यू मेंगलोंचे अवघ्या 37 व्या वर्षी निधन झाले आहे.
बीजिंग येथे बिल्डिंगवरून पडल्याने त्याचा मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना गुरूवारी,11 सप्टेंबर रोजी घडली आहे. त्याच्या मृत्यूच्या बातमीमुळे चाहते आणि सहकाऱ्यांना धक्का बसला आहे.त्याच्या मृत्यूमुळे सोशल मिडीयावर हळहळ व्यक्त केली जात आहे.
“तिने विवाहित पुरुषांसोबत…”, कुमार सानूचा मुलगा कुनिकावर भडकला; गायकाबरोबर ६ वर्षे होतं अफेअर
यू मेंगलोंग याच्या व्यवस्थापन टीमने शोक व्यक्त करत अधिकृत निवेदन जारी केले आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, असह्य दुःखाने, आम्ही जाहीर करतो की आमचा प्रिय मेंगलॉन्ग ११ सप्टेंबर रोजी मृत्युमुखी पडला.पोलिसांनी कोणत्याही गुन्हेगारी कटाचा संशय नसल्याचे स्पष्ट केले आहे. आम्ही त्यांच्या आत्म्यास शांती मिळो आणि त्यांच्या जवळच्या लोकांना या दुःखाचा सामना करण्यासाठी ताकद मिळो अशी प्रार्थना करतो’असं या निवेदनात म्हटलं आहे.
यू मेंगलोंगला विषयी थोडक्यात माहिती
यू मेंगलोंग याने २००७ मध्ये ‘माय शो, माय स्टाईल’ या टॅलेंट रिअॅलिटी शोमध्ये भाग घेऊन त्यांचा प्रवास सुरू केला. त्या
नंतर त्याने ‘द लिटिल प्रिन्स’ (२०११) या लघुपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.गेल्या काही वर्षांत, यू याने ‘गो प्रिन्सेस गो’, ‘लव्ह गेम इन ईस्टर्न फॅन्टसी’, ‘फ्यूड’ आणि ‘एटरनल लव्ह’ यासह अनेक चिनी नाटकांमध्ये काम केले. त्याचबरोबर अनेक संगीत प्रकल्प देखील प्रदर्शित केले आहेत.’द मून ब्राइटन्स फॉर यू’ मधील ‘लिन फॅंग’ यासारख्या प्रभावी भूमिकांसह त्याने आपली कारकीर्द आणखी मजबूत केली. अभिनयाव्यतिरिक्त, यू याने संगीत व्हिडिओ दिग्दर्शक म्हणूनही काम केले.
२०१३ मध्ये त्याने पुन्हा सुपर बॉयमध्ये भाग घेतला आणि टॉप १० स्पर्धकांमध्ये स्थान मिळवले.
या कार्यक्रमानंतर, त्याने जस्ट नाइस नावाचे गाणे प्रदर्शित केले.विद्यापीठासाठी चौथ्या आंतरराष्ट्रीय मायक्रो फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट स्वतंत्र चित्रपटाचा पुरस्कार मिळालेल्या द रुल्स या लघुपटात काम केल्यानंतर या अभिनेत्याला प्रसिद्धी मिळाली.